Maharashtra Governance News :राज्यातील आमदार, खासदारांसहलोकप्रतिनिधींनासंदर्भात शासनानेएकमोठानिर्णयघेतलाआहे. शासकीय कार्यालयांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) पाच महिन्यांपूर्वी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता. मात्रयानिर्णयातमोठाबदलकरण्यातआलाआहे. ज्यामध्ये एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास, चौकशी किंवा सुनावणीसाठी अपीलकार, पक्षकार म्हणून बोलाविण्यात आले असल्यास त्याला उभे राहून अभिवादन करण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परिणामीआता दोषी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक मिळणार आहे.
Maharashtra Governance : दोषी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक मिळणार
शासनाच्या नव्यानिर्णयानुसार, फौजदारी तसेच इतर प्रकरणांत दोषी लोकप्रतिनिधींना सेल्युट न करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यातआलेआहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आला असून चौकशीसाठी अथवा सुनावणी किंवा पक्षकार म्हणून समन्स करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींना देखील सेल्युट न करण्याचे स्पष्ट आदेश त्यातदेण्यातआलेआहे. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयात उपस्थित लोकप्रतिनिधींना सेल्युट न करण्याच्या सूचना देण्यातआल्याआहे.
Maharashtra Government Revised Order: सुधारित शासन निर्णय जारी
राज्यातील खासदार, आमदारांना शासकीय कार्यालयांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता. त्यातसांगण्यातआलेहोताकि, आमदार-खासदार भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून राज्य सरकारने मंगळवारी याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.
Government Order: ...तर सर्वसामान्यांप्रमाणेच लोकप्रतिंधींना वागणूक, जुन्या शासन निर्णयामध्ये सुधारणा
दरम्यानजुन्या शासन निर्णयामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास, चौकशी किंवा सुनावणीसाठी अपीलकार, पक्षकार म्हणून बोलाविण्यात आले असल्यास उभे राहून अभिवादन करण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. अशा सर्वप्रसंगी सर्वसामान्यांप्रमाणेच लोकप्रतिंधींना वागणूक देण्याचे निर्देश देखीलदेण्यातआलेआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
