Dharashiv Farmer News: पीक विमा योजना (Maharashtra Farmer Crop Insurance) ही संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे. पण तोच आधार जर जखमेवर मीठ चोळणारा ठरला तर? त्या वेदना किती असतील याची कल्पनाचकरवतनाही. मात्रअसाचएकप्रकार धाराशिवच्या (Dharashiv Farmer) अपंग शेतकरी दाम्पत्याच्यावाट्यालाआलाअसूनप्रशासनानेबळीराजाची क्रूर थट्टाचकेल्याचेआताबोललंजातआहे. धाराशिवच्या अपंग आणि दृष्टीहीन निराधार दाम्पत्य शेतकऱ्यानेसातशे रुपये उसने घेऊन पीक विमा (Farmer Crop Insurance)भरलाहोता. मात्रपरतावाम्हणूनत्याच्याखातात अवघे 211 रुपये मिळालेअसल्याने 'ही मदत की थट्टा?' असाप्रश्नविचारलाजाऊ लागलाआहे. (Dharashiv Farmer Crop Insurance News)
नेमकंप्रकरणकाय? (Dharashiv Farmer Crop Insurance News)
धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 च्या पीक विम्याचे वितरण सुरू आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली अत्यल्प भरपाई संताप वाढवणारी ठरत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आधाराची अपेक्षा असलेल्या अनेक शेतकऱ्यांना यंदा तोकडी भरपाई मिळाल्याने नाराजी वाढली आहे. या हजारो शेतकऱ्यांच्या वेदनांना चेहरा मिळाला आहे, तो वाशी तालुक्यातील वडजी येथील अपंग शेतकरी बबन कांबळे आणि त्यांची पत्नी राधा कांबळे यांच्या रूपाने.
Farmer Crop Insurance News: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, सरकार संकटात आधार देईल हीआशा, पण...
पोलिओमुळे बबन कांबळे पायाने अपंग आहेत, तर राधा कांबळे या दृष्टीहीन आणि भोळ्या स्वभावाच्या आहेत. मुलबाळ नसलेले हे दाम्पत्य एकमेकांचाच आधार बनून जगत आहे. त्यांचा संसार दीड एकर शेती आणि अनियमित मिळणाऱ्या निराधार पेन्शनवर चालतो. दोन पत्र्याच्या खोल्यांचे घर, घरात स्वतःचे वीजमीटरही नाही, शेजाऱ्यांच्या घरातून घेतलेल्या एका बल्बच्या उजेडात त्यांचे आयुष्य सुरू आहे. अशातच, सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरात त्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाहून गेले. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले. तरीही 700 रुपये उसने घेऊन "पीक विमा तरी संकटात आधार देईल" या आशेने त्यांनी विमा भरला. मात्र, महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या खात्यावर जमा झाले अवघे 211 रुपये. भरलेल्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाली. पूराने पीक हिरावून घेतले आणि विमा भरपाईने उरलेली आशाही.
Dharashiv Farmer : शेतकऱ्याला संकटात आधार देणारी योजना की जखमेवर मीठ चोळणारी व्यवस्था?
यंदा तर त्यांनी पीक विमाच भरलेला नाही. कारण मागील अनुभवाने त्यांचा योजनेवरील विश्वासच उडाला आहे. संकटाच्या काळात आधार मिळावा म्हणून भरलेला पीक विमा, आज अनेक शेतकऱ्यांसाठी वेदनेचा विषय ठरत आहे. ही केवळ बबन आणि राधा कांबळे यांची कहाणी नाही. पीक विमा योजनेतील बदल, काही महसूल मंडळे वगळली जाणे आणि अनेक शेतकऱ्यांना मिळालेली अत्यल्प भरपाई यामुळे धाराशिवमधील हजारो शेतकरी नाराज आहेत. आज बबन कांबळे यांच्या घरात ना शेतीतून उत्पन्न आहे, ना आर्थिक आधार. एकमेकांचाच हात धरून जगणाऱ्या या अपंग दाम्पत्याला आता केवळ सहानुभूतीची नाही, तर न्याय आणि खऱ्या आधाराची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
