Continues below advertisement

मुंबई : राज्यातील जिल्हा बँकांच्या भरती प्रक्रियावरुन (DCC Bank Recruitment) अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामध्ये पैशाचा व्यवहार केला जातो, ती पारदर्शक नसते अशी तक्रार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही अनेकदा केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा बँकांची भरती आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तसा जीआर शासनाने जारी केला आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी आणि पात्र उमेदवारांना संधी मिळावी यासाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा राज्य महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्या संबंधी शासनाचा जीआर जारी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Continues below advertisement

DCC Bank Recruitment Scam : भ्रष्टाचाराला आळा बसणार

शासनाच्या या नव्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होतो, आपल्याच लोकांची भरती केली जाते असा आरोप अनेकदा केला जातो. त्याला आता आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या बँकांची नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी वरील IBPS, TCS-आयऑन आणि MKCL या संस्थांकडून एकाच संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे.

DCC Bank Online Recruitment Process : स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी (Domicile Certificate ) असलेल्या उमेदवारांना 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 30 टक्के जागा जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि, जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागा स्थानिक उमेदवारांसाठी भरता येतील असं शासन आदेशात म्हटलं आहे.

दर शासन निर्णय आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पारदर्शकपणे जाहिरात व शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केली आहे त्या बँकांनाही लागू राहील.

ही बातमी वाचा: