एक्स्प्लोर

Maharashtra Din 2025 : हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी; महाराष्ट्र दिनी उत्तर भारतीय समाजाकडून समतेचा संदेश

Maharashtra Din 2025 : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षित गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Maharashtra Din 2025 : 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली होती. संपूर्ण राज्यभरात 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षित गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

कार्यक्रमाची सुरुवात आयोजक आणि उत्तर भारतीय नेत्यांनी मराठीतून भाषण करून केली. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह म्हणाले, “आमचा उद्देश केवळ मदत करणे नाही, तर सन्मानपूर्वक स्वावलंबन निर्माण करणे हा आहे. हा कार्यक्रम दाखवतो की, उत्तर भारतीय समाज महाराष्ट्राला केवळ रोजगाराचे साधन नाही, तर स्वतःची कर्मभूमी मानतो.”

या प्रसंगी वरिष्ठ भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी. म्हणजे हिंदी आमची आई आहे आणि मराठी आमची मावशी आहे. काही लोक निवडणुका जवळ आल्या की मराठी आणि गैर-मराठी यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना आपली राजकीय जमीन सरकताना दिसते, तेव्हा ते भाषेचा मुद्दा उचलतात.” कृपाशंकर सिंह यांनी असेही सांगितले की, “जे लोक मराठी अस्मितेची भाषा करतात, त्यांच्या स्वतःच्या मुलांचे शिक्षण मराठीत नाही तर इंग्रजी माध्यमातून होते.” त्यांनी उत्तर भारतीय समाजाला महाराष्ट्राच्या विकासाचा ‘समान भागीदार’ म्हणत म्हटले की, “हा समाज फक्त मजूर नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीत समर्पित नागरिक देखील आहे.”

बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मराठी-गैर मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय संघाचा हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जात आहे.

- नम्रता दुबे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुढील पाच वर्षात मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार, मंत्री नितेश राणेंची माहिती 
पुढील पाच वर्षात मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार, मंत्री नितेश राणेंची माहिती 
मोठी बातमी! मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी
मोठी बातमी! मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं
आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget