Maharashtra DGIPR on Gas Shortage : आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्याने जगभरात इंधन टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी घरगुती सिलेंडर (LPG), व्यावसायिक LPG आणि सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एरवी बुकिंगनंतर काही दिवसांमध्ये मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहेत. इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता नागरिकांच्या जीवनातही उमटू लागले असून युद्धाचा थेट परिणाम आता एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. तर तिकडे हॉटेल व्यवसायिकांना कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसात अनेक हॉटेल व्यवसायिकांकडे असणारा गॅसचा साठा संपुष्टात येऊन हॉटेल बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. असं या सर्व पार्श्वभूमीवर अनेक अफवांनाही पेव फुटल्याचे बघायला मिळालं आहे. परिणामी महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. अशी महत्वपूर्ण माहिती, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (Maharashtra DGIPR) दिली आहे. 

Continues below advertisement

Gas Shortage :  एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र...

घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. भू-राजकीय परिस्थिती आणि केंद्र सरकारचे निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. अशी माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयन विभागाने दिली आहे. 

Continues below advertisement

LPG Gas Shortage : हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना

अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील  युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे.कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे आणि उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत आहे. (Gas cylinder LPG) 

 इतर महत्वाच्या बातम्या