Dam water storage: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून जलसाठ्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. पुढील चार दिवसही घाटमाथ्यासह बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहणार आहे .दरम्यान राज्यभरातील धरण साठ्यात सध्या किती पाणी शिल्लक आहे ? कोणत्या विभागात धरण किती भरले आहेत? पाहूया ..
राज्यभरातील लहान मोठ्या अशा सर्व धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आता 63.97 टक्क्यांवर पोहोचला आहे .गेल्या वर्षी याच सुमारास राज्याचा पाणीसाठा हा 43.62% एवढा होता . कोकण व पुणे विभागात यंदा सर्वाधिक धरण भरली आहेत .कोकणातील लहान-मोठ्या 173 धरणांमध्ये 81.68% उपयुक्त पाणीसाठा आहे .तर पुण्यातील धरणांमध्ये 74.71% सरासरी उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद जलसंपदा विभागाने केलीय .
तुमच्या विभागात उपयुक्त धरणसाठी किती?
नागपूर विभाग - 51.34%अमरावती विभाग - 52.11%मराठवाडा विभाग -४९.०६%नाशिक विभाग -61.01%पुणे विभाग -74.71%कोकण विभाग -81.68%
मराठवाड्यात जलसाठ्यात वाढ
मराठवाड्यात सर्वात मोठे समजले जाणारे पैठणचे जायकवाडी धरण 78.47% भरले आहे .गेल्यावर्षी जायकवाडी धरणात 4.08% पाणीसाठा शिल्लक होता .यंदा धर्मक्षेत्र परिसरात व बहुतांश जिल्ह्यातच चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात 2441 दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे .त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर प्रकल्पांसाठी दिलासादायक चित्र आहे . जायकवाडीसह संपूर्ण मराठवाड्यात 49.06% जलसाठा झालाय .
बीड : मांजरा -24.73%, माजलगाव -12.98%हिंगोली : सिद्धेश्वर -34.35 %, येलदरी 62.38%नांदेड :निम्न मनार -53.22%, विष्णुपुरी 81.73%धाराशिव :निम्न तेरणा 70.18%, सीना कोळेगाव 42.26%लातूर : शिवनी 52.20%परभणी :निम्न दुधना 48.66%
नाशिक -नगरच्या धरणांमध्ये किती पाणीसाठा ?
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागात 61.01% उपयुक्त पाणीसाठा झालाय .गेल्या काही दिवसांपासून नाशिक घाटमाथासह शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली .त्यामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे . अहिल्यानगर : भंडारदरा 76.17%,मुळा 68.44%, निळवंडे 86.73%नाशिक : भाम धरण 100%, दारणा 83.45%, गिरणा 56.10 %, गंगापूर 62.38%,
पुण्याची धरणं किती भरली?
पुणे घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे . पुणे विभागातील धरण ७४.७१ टक्क्यांनी भरली आहेत .गेल्या वर्षी हा साठा 51.58% एवढा होता .डिंभे :78.17%,पवन-70.72%,भाटघर 89.19%खडकवासला 52.51%, पानशेत 82.25%सांगलीतील वारणा धरण 76.42% तर साताऱ्यातील कोयना धरण 71.61 टक्क्यांवर गेले आहे .सोलापूरच्या उजनी धरणात 95.39% पाणीसाठा आहे .गेल्या वर्षी उजनी यात सुमारास शून्यावर होते .कोल्हापुरातील दूधगंगा धरण 73.87 टक्क्यांवर असून राधानगरीत 95.6% पाणी शिल्लक आहे .
हेही वाचा