Maharashtra Coronavirus Update : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात एक हजार 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 1720 जणांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी राज्यात 2285 कोरोना रुग्णांची नोंद तर 2237 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. 


राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 1720 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,22,492 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 1855 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 11 हजार 866 सक्रीय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,38,07,615 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80,82,551 (09.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 80,82,551 झाली आहे. 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण कुठे?
राज्यात सध्या 11 हजार 866 सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत. मुंबईमध्ये 5825, ठाण्यात 1923, पुणे 1637 , नागपूर 343, भंडारा 104, अहमदनगर158, नाशिक 326, रायगड 263 आणि पालघर 293 सक्रीय रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यात 100 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. सर्वात कमी सक्रीय रुग्ण हिंगोलीमध्ये आहेत. सध्या हिंगोलीमध्ये फक्त 6 सक्रीय रुग्ण आहेत. 


आज कुठे सर्वाधिक वाढ - 
राज्यात आज एक हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज 840 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबई मनपा 120,  पुणे मनपा 145 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यात आज 100 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. मालेगाव मनपा, परभणी, नांदेड, अकोला मनप, अमरावती आणि चंद्रपर मनपामध्ये आज एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. 


देशातील स्थिती काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 2,482 रुग्ण घटले. देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामागील एक सकारात्मक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजारांहून अधिक आहे.