मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार  होताना  दिसत आहे.   बुधवारी राज्यात  186 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  955 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नागी. राज्यात गेल्या 24 तासात  174  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांचा मृत्यू


राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 471 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,01,09, 366  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  955 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 955 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 563  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 219,  ठाण्यात 76 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


 देशात गेल्या 24 तासांत 2483 नवे कोरोनाबाधित


देशात कोरोनाचा कहर कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात 1,970 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 1,970 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 622 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 23 हजार 311 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे