मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 707 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 782 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7151 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 78 हजार 858 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 916 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,60,78,616 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 213 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 210 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत आज 213 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
मुंबईत आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर सध्या 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत सध्या 1 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत आज 38,923 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 15 हजार 225 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागण
महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यासोबतच पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या
Mumbai Corona Update : मुंबईत आज 213 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 210 रुग्ण कोरोनामुक्त
Omicron Cases : महाराष्ट्रात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागण, पुण्यातील सात जण बाधित
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, दोघे पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha