मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज दहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 868 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 71 , 82, 510 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात 24 तासांत कोरोनाच्या 6 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
देशात बुधवारी कोरोनाच्या 6,984 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 87,562 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत देशात 3,41,46,931 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 4,76,135 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 1,34,61,14,483 डोस देण्यात आले आहेत. तर 6,984 दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये 3,377 रुग्ण फक्त केरळातीलच आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: