मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे.
राज्यात आज मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. आज एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.
मुंबई गेल्या 24 तासात 8479 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 8479 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाक 78 हजार 39 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्के आहे. सध्या 87 हजार 698 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 45 दिवस आहे.
पुण्यात आज 6434 रुग्णांची नोंद
पुण्यात आज 6434 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 56 हजार 636 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात 92 दिवसात 12 कोटी लसींचे डोस
भारतात कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू आहे. 92 दिवसात 12 कोटी कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. 12 कोटी लसींचा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला 97 दिवस आणि चीनला 108 दिवस लागले होते. देशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या डोसपैकी 59.5 टक्के लसींचे डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1 कोटी 21 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या चार राज्यांत प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.