मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे आज मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात काल 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.01 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,20,96,506 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,79,352 (14.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,24,745 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई आज 676 रुग्णांची नोंद, तर 27 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 676 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 546 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,97,140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,598 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 744 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात आज नव्याने 269 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 269 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 072 इतकी झाली आहे.शहरातील 220 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 67 हजार 725 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 694 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 81 हजार 143 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 748 रुग्णांपैकी 285 रुग्ण गंभीर तर 421 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 599 इतकी झाली आहे.