Maharashtra budget session 2023 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 


अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका


अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या आहेत. मात्र, त्यांच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात मूळ समस्यांना बगल देण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळं आज विरोधक सभागृहात पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. आज अर्थसंकल्पावरील चर्चेबरोबरच गेल्या आठवडाभरापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर देखील चर्चा केली जाणार आहे.


कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यत


सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. ठिकठिकाणी शेतकरी संघटनांसह शेतकरी आंदोलन करत आहेत. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, त्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. तसेच अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आमि गारपीटीमुळं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. त्यावरही सरकारनं अद्याप निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दोन्ही मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु आहेत. माहिती मागवली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार काय दिलासा देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: