Maharashtra Budget 2026: संपूर्णराज्याचेलक्षलागूनराहिलेला राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (6 मार्च) सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केलाय. विशेष म्हणजे दिवंगतउपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडलाय. माझं अंतःकरण जड झालं आहे. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या कडक स्वभावामुळे शिस्त राहीली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारलं जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प त्याना सादर करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनीया अर्थसंकल्पालासुरुवातकेली. दरम्यानया अर्थसंकल्पातनागपूरसह विदर्भाच्यावाट्यालाकायकायआलंआहे? हेसमजूनजाणूनघेऊया.
Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात गडचिरोली, नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
- नागपूरशहराच्या विकासालाचालनादेण्यासाठीनागपूररिंगरोडलामान्यतादेण्यातआलीआहे.
-नागपूरजिल्ह्याच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार
रामटेकयेथेरामशृष्टीआणिकालिदासशृष्टी उभारणार
महाकवीकालिदासयांचेजीवनचरित्रनव्यापिढीलाकळावंयासाठीआवशयकतेसहकार्यकेलंजाईल.
-गडचिरोलीत नवं स्टील हब म्हणून उदयास, २ लाख कोटींची गुंतवणूक तर ७० हजार रोजगार
-गडचिरोलीजिल्ह्यातलोहखनिजांवरविशालस्टीलहबच्यामाध्यमातून 2 लाख 62 हजारकोटींचीगुंतवणूक
-गडचिरोली जिल्ह्यातीलखनिजसंपत्तीचीवाहतूकसुरळीतहोण्याकरताआणिजिल्ह्याच्याविकासालागतीदेण्याकरतारस्त्यांचीकामेहातीघेण्यातआलीआहे.
- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
-प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. त्यातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार
-प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर उभारणार
-बांबू विकास प्रकल्प वाढवणार
- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
-अमरावती आणि लातूर, बारामती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
-अमरावती, अकोला, शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण
-राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल
-वर्धाजिह्यातीलपवनारतेपत्रादेवीजिल्हासिंधूदुर्गशक्तीपीठमहामार्गालामान्यता
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विमानतळांसाठी कोणत्या घोषणा? (Devendra Fadnavis On Maharashtra Airport)
- 25-12-25 पासून नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात
- पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात
- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
- लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
- शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण
इतर महत्वाच्या बातम्या
