एक्स्प्लोर

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? 10 मार्च रोजी सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष!

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी आर्थिक मदत ही 2100 रुपये केली जाईल, असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. लवकरच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभात वाढ करावी, अशी मागणी विरोधक करत होते. असे अशतानाचा आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर या मागणीने जोर धरला असून यावेळच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहि‍णींना वाढीव लाभ मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

महायुतीने केली होती घोषणा

महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून चालू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू, असे आश्वासन दिले होते. ही रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करून असे महायुतीने म्हटले होते. त्यानंतर लाडक्या बहि‍णींना महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपयांपर्यंत वाढ करणार का? असे विचारले जात आहे. 

10 मार्च रोजी घोषणा होणार का?

महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या पैशांत वाढ करण्याची घोषणा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम 2100 रुपयांवर नेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका? अर्थखात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री

Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?

व्हिडीओ

Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
Embed widget