Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर DGCAने मोठा निर्णय घेतला आहे. बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवईकांना सोपवण्यास सुरूवात केली आहे. अनेक...More
छत्रपती संभाजीनगर जिल्यातील सिल्लोडच्या सारोळा गै.गावातील दुर्दैवी घटना.शेतात पेरणी करताना अंगावर वीज पडून दोन सख्या भावांचा मृत्यू.रोहित काकडे वय 20 आणि यश काकडे वय 17 अस मृत तरुणाचं नाव . दोन्ही तरूण आई सोबत शैतात पेरणी करत असताना अचानक पाऊस चालू झाल्यानै आणि विजेचा कडकडाट झाला अचानक त्यांचा अंगावर विज पडली आणि हे दोन्ही ही तरूण मृत पावले.
छत्रपती संभाजी नगर मध्ये आज दुपारी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी
रंजना बापुराव शिंदे रा. मोढा बू. ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर वय 50वर्ष यांच्या वर मोढा बू. शिवारातील गट क्रमांक 266मध्ये वीज कोसळून मृत्यू पावल्या आहेत.
मौ.पिंपळदरी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथे सख्या भावावर विज पडली शिवाजी सतीश गव्हाणे यांचा मृत्यू झाला आहे तर
जीवन सतीश गव्हाणे गंभीर जखमी झाले आहे.
मुंबईच्या सायबर पोलिसांनी एका ४५ वर्षीय महिलेच्या फसवणूकी प्रकरणी दिल्लीतून एका प्रसिद्ध यूट्यूबरला अटक केली आहे
पियुष कटियाल असे या आरोपीचे नाव आहे
पियुष हा यूट्यूबवर असंख्य प्रॅक व्हिडिओ बनवतो. याच माध्यमातून सोशल मिडियावर त्याचे ५ लाखाहून अधिक फॅन आहेत
पियुषचे व्हिडिओ पाहून ४ ते ५ महिन्यापूर्वी ४५ वर्षीय महिलेने त्याचे अकाऊंट फाॅलो केले होते
व्हिडिओवरील कमेंट पाहून पियुषने तिच्याशी संपर्क केला, कालांतराने दोघांनी एकमेकांना आपले नंबर शेअर केले
काही दिवसांनी विविध मेडिकल एमरजन्सीचे कारण सांगून पियुषने तिच्याकडे पैशांची मागणी केली
महिलेनेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मदत केली, मात्र त्यानंतर विविध कारणं सांगून वारंवार पियुष महिलकडे पैसे मागू लागला
तसेच पैसे न दिल्यास स्वत:च्या मोबाइलवर चॅटिंगचे फोटो टाकून बदनामी करण्याची तर कधी पोलिसात ओळख असल्याची धमकी देऊ लागला
या महिलेकडून पियुषने अशा पद्धतीने अंदाजे १९ लाख उकळले.
मात्र पियुषची पैशांची मागणी थांबतच नसल्याचे पाहून अखेर महिलेने उत्तर सायबर पोलिसात धाव घेतली.
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर उत्तर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात करत पियुषला दिल्लीतून अटक केली आहे
पियुषला न्यायालयात हजर करत न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे
सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह परिसरात मुसळधार पावसाला झाली सुरुवात.... बामनोली तापोळा कांदाटी खोऱ्यासह कोयना जलाशयात मुसळधार पाऊस.
सातारा सह जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी आले असून त्यांच्या दरे गावासह बामणोली,तापोळा,कांदाटी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने वातारणात चांगलीच आद्रता वाढल्याच पहावयास मिळाल आज बरसलेल्या पावसा नंतर आता खरीप पेरणीला वेग येणार आहे...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र गेल्या अनेक वर्ष पुणे शहरात मेट्रोची काम सुरू आहेत त्यामुळे या मेट्रो कंपन्यांकडून अनेक रस्त्यांवर राडाराडा टाकला जातो त्याच बरोबर काही रस्ते देखील मनमानी पद्धतीने बंद करण्यात आलेत.
पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मेट्रो अधिकाऱ्यांना देखील बोलण्यात आले होते आणि त्याच बैठकीत अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत तातडीने रस्ते रिकामे करा राडाराडा हटवा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.. वेळेवर जर काम झाली नाहीत तर दहा कोटी रुपयांचा दंड वसूल करू ..
कसारा
मध्ये रेल्वेच्या कसारा सिएसटी मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळित...
खर्डी जवळ उंबर माळी स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड....
साडेदहाच्या सुमारास एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
एक्सप्रेसच्या मागे अनेक लोकल उभी
सकाळी ११ वाजल्यापासून लोकल सेवा विस्कळित...
११: ०१ कसारा, ११:२४ आसनगाव, ११:५३ कसारा, १:०२ कसारा या चार लोकल उशीरा धावणार....
१:२४ आसनगाव ठाणे लोकल प्रथम काढण्यात आली...
खर्डी स्टेशन येथून दुसरे इंजन मागवून हावडा एक्सप्रेस पुढे पाठवण्यात आले
अडीच तास मध्ये रेल्वेची कसारा सिएसटी रेल्वे वाहतुकीवर ठप्प झाल्याने
प्रवाशांत रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रोश....
सध्या कसारा सीएसटी मार्ग वर लोकल रेल्वे उशिराने धावत आहेत
अमरावती : बच्चू कडू यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू हे मागील 6 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसले होते. आज सातव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केलं आहे. दरम्यान, बच्चू कडू यांची प्रकृती खूप खालावली होती. उपोषण स्थगित करताच बच्चू कडू यांना अमरावती येथील रिम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे : मुठा नदीत वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्रकाश मारुती काळेकर (67) असे या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील महानगरपालिका जवळ असलेल्या नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला आहे. एक मृतदेह नदी पात्रात वाहून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाकडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शिवाजीनगर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.
बच्चू कडू यांची मोठी घोषणा
तब्बल 7 सात दिवसानंतर बच्चू कडू यांचे आंदोलन मागे...
आजचं माझं अन्यत्याग आंदोलन मागे- बच्चू कडू यांची घोषणा
कर्जमाफीची 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारने तारीख सांगावी अन्यथा 2 ऑक्टोंबर नंतर मंत्रालयात घुसून आंदोलन करणार
संपूर्ण महाराष्ट्रात दोन ऑक्टोबर पर्यंत फिरणार...
2 ऑक्टोंबर च्या आत सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी- नाहीतर मंत्रालयात मोठा आंदोलन होणार याची दखल सरकारने घ्यावी
मंत्री उदय सामंत यांची यशस्वी शिष्ठाई
बच्चू कडू थोडयाच वेळात उपोषण सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती
मंत्री उदय सामंत लेखी पत्र देणार त्यानंतर बच्चू कडू आपलं उपोषण सोडणार असल्याची माहिती..
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आश्वासन दिलं तेच पत्र उदय सामंत बच्चू कडू यांना देणार
मंत्री उदय सामंत बच्चू कडूच्या भेटीला
कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाचा आज सातवा दिवस...
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर...
बच्चू कडूच्या मागण्या संदर्भात उदय सामंत आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा सुरू...
बच्चू कडूंच्या मागण्यावर आज तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष..
सहा दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने बच्चू कडूंची प्रकृती खालावली..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची भेट घेतली
अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त
रत्नागिरी जिल्ह्यातील शरद कृषी भवनच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची शरद पवारांची निकम यांना भेटीदरम्यान सूचना
लवकरच शरद पवार या कृषी केंद्राला भेट देणार
एआय तंत्रज्ञान आधारीत शेतीसाठीच्या सुविधांसाठी कशाप्रकारे काम करता येईल याची शरद पवारांकडून निकम यांना माहिती
अहमदाबाद विमान अपघातासंबंधी मोठी बातमी
ब्यूरो ऑफ़ सिविल एविएशननं एअर इंडियाकडून अहवाल मागवला
सीईओ कँपबेल विल्सन यांना मेल पाठवून माहिती मागवली
गेल्या ३० दिवसांत दुर्घटनाग्रस्त विमान किती वापरले? अशी विचारणा
विमानाची तांत्रिक आणि देखभालीची सविस्तर माहिती मागितली
दुर्घटनाग्रस्त विमानाचा ट्रॅक रेकॉर्डही ब्युरोनं मागवला
१३ दिवसांत साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा अहवाल देण्याची सूचना
अहमदाबाद विमान अपघातानंतर शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, दीडशे स्वयंसेवक गट निर्माण करून करतात विविध ठिकाणी करताय मदत कार्य
अहमदाबाद मध्ये गुरुवारी विमान अपघात झाला आणि या विमान अपघातानंतर विविध यंत्रणा एकत्र येऊन काम करताना पाहायला मिळताय...
या शासकीय यंत्रणांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा रात्रंदिवस काम करताना अहमदाबाद मध्ये पाहायला मिळताय
एकूण 150 स्वयंसेवक रुग्णालयातील विविध विभाग, वाहतूक नियंत्रण, घटनास्थळ या ठिकाणी पोलीस प्रशासन रुग्णालय प्रशासनाला मदत करताना पाहायला मिळत आहेत
मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मदत, त्यांच्यासाठी जेवण नाश्त्याची सोय, त्यांना हवी ती मदत स्वयंसेवकांकडून अहमदाबाद मध्ये केली जातीये
आरएसएस स्वयंसेवकांकडून कशाप्रकारे मदत केली जाते याचा आढावा अहमदाबाद मधील सिविल रुग्णालयातून घेतला आहे
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होतात अमरावतीच्या शेतकऱ्यांनी विचारला जाब
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ वाहतूक कोंडी
शनिवार रविवार सुट्टी करिता आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी
माणगाव शहरापासून ते मुगवली फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा
शनिवारी आणि रविवारी सातत्याने माणगाव करांना भेडसावते वाहतूक कोंडीची समस्या
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ वाहतूक कोंडी
शनिवार रविवार सुट्टी करिता आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी
माणगाव शहरापासून ते मुगवली फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा
शनिवारी आणि रविवारी सातत्याने माणगाव करांना भेडसावते वाहतूक कोंडीची समस्या
विठ्ठल भक्तांना तासान तास दर्शन रांगेत थांबावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धरतीवर असणारी टोकन दर्शन व्यवस्था उद्यापासून सुरू होत असून आज याच्या बुकिंग ला सुरुवात करण्यात आल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच ही प्रणाली लागू होत असून भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आग्रह धरला होता असे गोरे यांनी सांगितले.
विठ्ठल दर्शनासाठी वीस वीस तास आणि यात्रा कालावधीत 35 ते 40 तास दर्शन रांगेत थांबाव्या लागणाऱ्या वृद्ध महिला आणि लहान मुलांचे त्रास आता यामुळे कमी होणार असून या टोकन प्रणालीमध्ये ज्या वेळेचे टोकन असेल त्याच वेळेला या भाविकांना मंदिराशेजारी असलेल्या दर्शन मंडप येथे जावे लागणार आहे. या ठिकाणी भाविकांना आरामशीर बसून केवळ एका तासात दर्शन मिळू शकणार आहे. या भाविकांच्या प्रतीक्षा हॉलमध्ये भाविकांना स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आल्या असून त्यांना दर्शन रांगेत मोफत चहा पाणी दिला जाणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
दरम्यान उद्या दिवसभरातून सहा स्लॉटमध्ये बाराशे भाविकांना या पद्धतीने टोकन घेऊन दर्शन मिळणार आहे. यासाठी टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन आज सकाळी 10.00 पासून www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकींग सुरू झाले आहे.
पुणे शहरातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून नवीन ॲप
वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पुणे वाहतूक पोलिसांकडून PPT नावाच APP लाँच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते APP च उद्घाटन
PPT ॲप वरून पुणेकरांना थेट करता येणार पुणे पोलिसांकडे तक्रार
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ॲपवरून पुणेकर करू शकणार पुणे पोलिसांकडे तक्रार
शहरात असणारी वाहतूक कोंडी, शहरातील विविध ठिकाणचे नो पार्किंग झोन पार्किंग, फुटपाथ वरून वाहने चालवणे, नो एन्ट्री तुन वाहन चालवणे यासारख्या वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांचे फोटो थेट ॲप वरती टाकत तक्रार नोंदविता येणार
यासह शहरातील खड्डे, अपघात रस्त्यावर साचलेले पाणी, रस्त्यावर झालेल्या विविध घटना आणि अपघात याची तक्रार देखील थेट पुणे पोलिसांना करता येणार
नाशिक शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यावर संतापले
-
महापालिका, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना भुजबळ यांनी फटकारले
मुबंई नाका।ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत याबाबत विचारणा केली असता आमचे काम नाही असे मनपाच्या अधिकारी नी उत्तर दिल्यानं भुजबळ संतपले
पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देतांना ही भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला
राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्ह्यातील स्थानिक आमदार, तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतील.
आजच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकास आराखड्यासोबतच, त्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन, स्थानिक गरजांनुसार योजनांची प्राधान्यक्रमाने निवड, आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे...आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत...काल बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती...अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती बावकुळेंनी केली होती...मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत...बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली...यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्यानं पहायला मिळालं...मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं असं आव्हान नयना कडूंनी केलंय...
अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलं
मेट्रोने दोन दिवसात मेट्रो परिसरातील राडारोडा काढला नाही तर दंड करणार
पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रोला खडसावलं
आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागाची एक बैठक पार पडली
पालखी शहरात येण्या अगोदर राडारोडा काढून घ्या मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावल
पुण्यातील वाहतूक अडचणीत काही प्रमाणात मेट्रोचा राडाराडा जबाबदार असल्याचा अजित पवार बैठकीत विधान
बैठकीत मेट्रो अधिकाऱ्यांनी वाहतूक अधिकारी उपस्थितीत
आज पुन्हा सकाळपासून अहमदाबाद सिविल हॉस्पिटलच्या कसोटी भवन येथे डीएनए टेस्ट प्रक्रियेला सुरुवात..
सकाळी नऊ वाजेपर्यंत आतापर्यंत 240 डी एन ए टेस्ट करण्यात आले आहेत... त्यामध्ये आतापर्यंत 227 प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत तर इतर 13 मृतदेहांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले आहेत
डीएनए टेस्ट काम अजूनही कसोटी भवन येथे सुरू असून उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा डीएनए टेस्टचा आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे
साधारणपणे 72 तासानंतर डीएनए टेस्ट मॅच चे रिपोर्ट समोर येतील... त्यामुळे नातेवाईकांना संयम ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढाव बैठकीला सुरुवात
बैठकीत वाढती कोरोना रुग्ण संख्या, पालखी सोहळा, पुण्यातील वाढते अपघात, मॉन्सूनपूर्व कामाचा आढावा अजित पवार घेणार
अजित पवार यांच्या उपस्थितीत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त तसेच दोन्ही शहराचे पोलीस आयुक्त यांची बैठक सुरू
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या दिवेघाटातून जाणार आहे त्या दिवे घाटाची पावसानी केले दुरावस्था
येत्या आठ दिवसांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लाखो वारकऱ्यांना सोबत याच दिवेघाटामधून प्रवास करणारा असून काल रात्रीच्या पावसाने दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे रस्त्याचे दुरावस्था झाल्या असून रस्ता दुरावस्थेत काम युद्ध पातळीवरती सुरू आहे
लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या राज्य सरकारला लाडक्या वारकरीचा विसर पडला आहे का? वारकऱ्यांमधून नाराजीचा सुर
-
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या दिंडी ना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती यंदाच्या वर्षी मात्र सरकारला अर्थ सहाय्याने करण्याचा विसर पडल्याची नाराजी
मागील वर्षी निवडणूक असल्याने आर्थिक मदत जाहीर केली होती का ,यंदाच्या वर्षी निवडणूक नाही त्यामुळे निधी दिला जात नाही का वारकरीकडून संतप्त सवाल
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत निधी बाबतीत विचारणा केली मात्र वारी सुरू झाली तरीही अद्याप निर्णय झाला नसल्याची संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराज देवस्थान चे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांची माहिती
गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची मशागतीची कामेही आटोपली मात्र पावसाने दडी मारल्याने आता पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पेरणी योग्य पाऊस अद्यापही न भर असल्याने पश्चिम विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत व शेतकरी पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मशागतीची कामे आटपून शेतकरी बी बियाणे व खते साठवून ठेवण्याच्या लगबगीत आहेत.बुलढाणा जिल्ह्यात 18 लाख हेक्टरवरील तर पश्चिम विदर्भात 63 लाख हेक्टर वरील पेरण्या खोळंबल्याच चित्र आहे.
कोल्हापूर ब्रेकिंग
जागेच्या वादातून झाली जोरदार हाणामारी
पाच जणांनी सचिन पांडुरंग पाटील या व्यक्तीवर केला जीवघेणा हल्ला
काट्या आणि खूरप्यासह हल्ला
करत केली बेदम मारहाण
पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावातील घटना
स्वतःच्या मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या दृष्टीने इंजिनीयरला जागा दाखवत असताना शेजारीच राहणाऱ्या पाटील कुटुंबीयातील पाच जणांनी केला जीवघेणा हल्ला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढाव बैठकीला सुरुवात
बैठकीत वाढती कोरोना रुग्ण संख्या, पालखी सोहळा, पुण्यातील वाढते अपघात, मॉन्सूनपूर्व कामाचा आढावा अजित पवार घेणार
अजित पवार यांच्या उपस्थितीत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त तसेच दोन्ही शहराचे पोलीस आयुक्त यांची बैठक सुरू
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पॅनल निवडणूक लढवणार अशी चर्चा होती परंतु पुन्हा एकदा आमने-सामने आलेले आहेत. आज दोन्ही पक्ष प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलचा आज बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे साडेतीन वाजता प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील पणदरे येथे प्रचाराचा नारळ संध्याकाळी सहा वाजता फोडला जाणार आहे. कालच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी आपला निरावागज गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेलं असतं. अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ज्येष्ठ नेते सहकार महर्षी चंद्रावर तावरे यांचे देखील पॅनल अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या पक्षासमोर उभा आहे. आता नेमकी या त बाजी कोण मारत हे पाहणे महत्त्वाचा असणार आहे. 22 जूनला मतदान आहे तर 24 जूनला याचा निकाल आहे.
नरवण बाजारपेठ मध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.
नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुद्धा झाले कठीण. चिखलमय रस्त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम.
ग्रामस्थांची प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी.. पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजारपेठेत पाणीच पाणी.
काल रात्री आयटी पार्क हिंजवडीचं पुन्हा एकदा वॉटर पार्क झालं होतं. पण गेल्या आठवड्याभरात नालेसफाई झाल्यानं, रात्रीची परिस्थिती आवाक्या बाहेर गेली नव्हती. पावसाने विश्रांती घेताचं पाणी ओसरले अन सकाळी मार्ग ही खुला झाला. रात्री मात्र या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं. गेल्या शनिवारी हेचं पाणी कंबरेइतकं होतं. त्यानंतर प्रशासनावर चहुबाजूंनी टीका झाली अन आठवड्याभरात नालेसफाई करण्यात आली. त्यानंतर कालच्या पावसाने किमान परिस्थिती हाताबाहेर तरी गेली नव्हती. मात्र अद्याप ही पाणी साचत असल्यानं नालेसफाई अथवा पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन पुर्णतः पास झालं नाही, हे यातून स्पष्ट झालेलं आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सोलापूर दौरा रद्द
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देण्याच्या कारणास्तव दौरा रद्द झाल्याची माहिती
मंत्री उदय सामंत आज दिवसभर सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी देणार होते
शिवसेना शिंदे गटाच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात मंत्री उदय सामंतांच्या हस्ते होणार होती
मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावातील पूल गेला वाहून
पुल वाहून गेल्याने अनेक गावचा संपर्क तुटला
बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्याने आरळी - दर्शनाळ - मुस्ती या मार्गावरील वाहून गेल्याने ग्रामस्थांचे आंदोलन
सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलात बसत केला निषेध व्यक्त
मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेल्याने तातडीने नवीन पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी
10 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू, कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर
काल संध्याकाळी घडलेली मंठा तालुक्यातील गारठेकी गावातील घटना
33 वर्षीय पवन पवार हे घराच्या टेरेसवर जाऊन झाडाच्या वाढलेल्या फांद्या छाटत असताना घरावरून गेलेल्या इलेक्ट्रिक तारांचा शॉक लागला
पवन पवार यांच्या अचानक झालेल्या मृत्यू नंतर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली आहे. मे महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. तर तीन प्रकल्पांमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त साठा झाला आहे.
सोमवार 16 जूनपासून मुंबईत महापालिकेच्या आशा सेविकांचे आंदोलन
मागच्या वर्षी आशा सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी 45 दिवस आंदोलन केले होते
शिंदे सरकारच्या काळात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते
अद्याप मागण्या पूर्ण झाली नसल्याची बाबा समोर मांडत आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे
29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे, महापालिका आशासेविकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान वेतन देणे, आशासेविकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्त झालेल्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागेवर महापालिकेच्या आशासेविकांना आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करणे, ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र, स्टेशनरी अप्रॉन देणे, कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये अश्या अनेक मागण्यासाठी आंदोलन
अहमदाबाद अपघाताबाबत केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू
तीन महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार
केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीकडून तपास
विद्यमान नियमावलीसह भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने तपास
केंद्रीय गृहसचिवांची समिती लवकरच घटनास्थळी भेट देणार
ब्लॅक बॉक्समधील डेटा, कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर तपासणार
नांदेड जिल्ह्यातील करडखेडला जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झालीय, त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय. या जीवघेण्या खड्ड्यातूनच मार्ग काढत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. याच रस्त्यावर रोज नित्यनेमाने अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कर्नाटक सीमेसह शेजारच्या लातूर जिल्ह्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने नाईलाजाने वाहनधारकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...