Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर

Maharashtra Breaking Updates: राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या बातम्यांसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 13 Jul 2025 03:51 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking Updates: राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात देखील आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तसेच राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या बातम्यांसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी,...More

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासलं काळं

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते.  त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.  यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं.