Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 31 Jul 2025 04:14 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावलंय. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः...More

हिंजवडी सरपंचांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल, आमचा आवाज कोण ऐकणार?

पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते.  यावर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीयन्स यांचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही. मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीच खराब होत आहे. गावकऱ्यांच म्हणणं ऐकून घ्यावे. अनेक मंदिर, शाळा, घरे रोड मध्ये जाणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे की, यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत.