Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स

मुकेश चव्हाण Last Updated: 09 Feb 2025 01:28 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील शुभ- दीप निवासस्थानाला रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ...More

दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर; पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार

धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार...


दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर..


पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना......


कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप......


आधार कार्ड ,कोर्टाच्या नोटिसा ,बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे फेकले उघड्यावर....


पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला समोर.....


वाटप होत नसल्याने महत्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये पडून....


गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिस मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती.....


एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असतं मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.