- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: अशोक मोहिते मारहाण प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्यात विविध घडामोडी देखील घडत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून (7 फेब्रुवारी) पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन होणार असून...More
-छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा रक्षण करण्याकरिता ज्या वाघनखांचा वापर केला होता, ती वाघनखे महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे ती भारतात आणली गेली. साताऱ्यात लाखो लोकांनी ती वाघनखं पाहिली.
- छत्रपतींच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने, कल्पकतेने छत्रपतींनी त्याच्यातून मार्ग काढला.
-अफजलखानाशी भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर आई जिजाऊसह अनेकांच्या मनात शंका होती.
- अनेकांनी भेटीला जाण्यास मनाई केली, तरी स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती गेले.
-अफजलखाने छत्रपतींना मारण्याचा प्रयत्न केला असला तरी वाघनखांचा वापर करून छत्रपतींनी अफजलखानाला धाराशाही केले.
-पारतंत्र्याचा अंधकार असताना मा जिजाऊ शिवरायांना देश, देव आणि धर्माची लढाई लढण्यास सांगितले.. वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपतींनी तो लढा सुरू केला.
-आज जो स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे त्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली आहे... राजा, शासक आणि शासनाने कसा कारभार केला पाहिजे याचा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांनी दिला. पाण्याचे नियोजन, पर्यावरण रक्षण, महिलांचे रक्षण, कायदा सुव्यवस्था कशी राखावी हे सर्व छत्रपतींनी शिकवले... म्हणून ते आपले आराध्य दैवत आहे.
-ही वाघनखं स्वराज्याची शस्त्रे आहेत.
पुणे: फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू आहेत. तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत..
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील कन्नड येथे दिव्यांग व्यक्ती श्रवणकुमार धोटे यांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करीत दिव्यांग हक्कांसाठी कार्य करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महाराष्ट्र सरकारकडे विविध मागण्यासाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम कायदा 2016ची त्वरित अंमलबजावणी करून दिव्यांगांना संजय गांधी योजना अंतर्गत ६,००० रुपये मासिक मदत देण्यासह शासन निर्णयानुसार २०० चौ. फूट व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, दिव्यांगांच्या कर्जमाफीसह शासकीय योजनांचा लाभ सुलभ करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
- नाशिकच्या दिंडोरी रोडवरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक
- अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार करून पळ काढला
- दोन दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड
- या हल्ल्यांमागील कारण अद्याप स्पष्ट नाही
- घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- म्हसरूळ पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू
जालना : येथे वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळतोय. चक्क वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफीयांनी दगडफेक आणि मारहाण केल्याचे समोर आले आहे. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक गावात काल रात्री ही घटना घडली आहे. या दगडफेकीत मंडळ अधिकारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या जालन्यातील अंबड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पी. डी .शिंदे असं या दगडफेकीत जखमी झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती घनसांवगीच्या तहसीलदारांनी दिली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात करण्यात आलेली याचिका मागे घेण्याच्या सूचना
याचिका वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारावर असल्याचा विखे पाटलांच्या वकिलांचा कोर्टात दावा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात एका कार्यक्रमात वाळू माफियांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य केल्याविरोधात करण्यात आली होती याचिका
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दाखल केली ही होती याचिका
मात्र याचिका दाखल करण्याइतके पुरावे आणि तथ्य उपलब्ध नसल्यानं हायकोर्टाचा सुनावणीस नकार
जळगाव : पोलिसांनी मोठी कारवाई करत धुळे येथील नंदलाल भालेराव या अट्टल दुचाकी चोरास अटक केली आहे. त्याने जळगाव व धुळे जिल्ह्यातून तब्बल 15 मोटरसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. जळगावात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असताना एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या कसून तपासानंतर आरोपीकडून चोरीच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरीच्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
जत : चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून घटनेच्या निषेधार्थ आज जतमध्ये सर्व समाजाकडून बंद पुकारण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी जतमध्ये एक मोर्चा देखील निघणार आहे. बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि हे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जत शहरामध्ये आज हा बंद पाळण्यात आलाय.
मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांचा 60 फुटी पुतळा उभारणार
स्टॅचू ऑफ युनिटी उभारणाऱ्या कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम
पुतळ्याच्या पायासाठी पूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार
साठ फूट उंचीचा पुतळा ब्रॉन्ज मध्ये तयार करण्यात येणार
पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल घेतला आढावा
बारामती : येथील नगर परिषदेच्या गाडीने दुचाकी स्वाराला धडक दिल्याच्या कारणावरून वाहन चालकाने रास्ता रोको केला. मुलीला शाळेत सोडायला गेले असता नगर परिषदेच्या घंटा गाडीने त्यांना घासून गेली, त्यावरून दुचाकी स्वार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बारामती भिगवण रस्त्यावर दुचाकी चालकाने रास्ता रोको केला. घंटा गाडीचा चालक दारूच्या नशेत असल्याचे पालकाचे म्हणणं आहे. काही वेळ रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. नगर परिषदेच्या घंटा गाडीवर नंबर देखील नाहीये. संबंधित गाडीवर कारवाई व्हावी तसेच चालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
पुण्यातील बोपदेव घाटात PMPL चा भीषण अपघात.
बोपदेव घाटात कंटेनर आणि PMPL बसची जोरदार धडक.
सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी नाही. मात्र, 2 जण गंभीर जखमी.
आज सकाळी ६ च्या सुमारास घाटात घडला अपघात.
कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल.
घाटात वळणावर कंटेनरचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.
सांगलीत कृष्णामाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहनाने झालीय. सांगली महापालिका, गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्यावतीने सरकारी घाटावरील कृष्णामाई मंदिरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालघर- मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे मोठी वाहतूक कोंडी
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे वाहतूक कोंडी
गेल्या काही महिन्यापासून या महामार्गाचे सिमेंट काँक्रीट आणि पूल उभारणीचं काम सुरू असून हे काम संथ गतीने सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचा समोर आल आहे.
नवीन तूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल होताच तूर पिकाच्या दराचा दर आलेख कमी होताना पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी तूर 1400 रु प्रति क्विंटल विक्री होत होती. मात्र,या वर्षी नवीन तूर बाजारात दाखल होताच तुरीला मिळणार हमी भाव 7550 रु त्या पेक्षा 500 रुपयांनी कमी दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
वाढवण बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेऊन राज्य सरकारने वाढवणसह परिसरातील 13 गावांमधील 33 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आता एम.एस. आर.डी.सी कडून 107 गावांमधील 512 चौरस किलोमीटरचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे . या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ आणखीन एक मुंबई वसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमएसआरडीसी 388 किलोमीटर लांबीच्या कोकण द्रुतगती महामार्गसह 498 किलोमीटर लांबीचा रेवस रेड्डी सागरी किनारा महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे . या प्रकल्पालगत 105 गावांमध्ये 449 चौरस किलोमीटर क्षेत्रावर तेरा विकास केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे पालघरसह राज्याचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास एमएसआरडीसीकडून व्यक्त करण्यात आला आहे .
कोल्हापुरात खंडपीठाच्या मागणीसाठी 18 फेब्रुवारीला महारॅली
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार वकिलांचा मोर्चा
बार असोसिएशनच्या विशेष बैठकीत निर्णय
सहा जिल्ह्यातील वकिलांची देखील बैठक घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाणार
राज्यकर्त्यांकडून खंडपीठासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचाही बैठकीत सुर
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबतही वकिलांची बैठकीत नाराजी
उच्च न्यायालयाच खंडपीठ कोल्हापूर मध्ये व्हावं यासाठी गेल्या चार दशकांपासून सुरू आहे लढा
अंतरवली सराटीमधील उपोषण स्थळावरील मंडप काढला..
उपोषणाचे स्टेज देखील काढले..
मनोज जरांगे यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थ आणि सरपांचांकडून काढण्याचा निर्णय.
सातवे उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी आपण उपोषण करणार नसून समोरासमोरची लढाई लढणार असल्याचा इशारा दिला होता..
29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी मधून पहिल्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती..
मेळघाटातील रेट्याखेडा गावातील एका वृद्ध महिलेची धिंड काढल्याचा प्रकरणात चिखलदऱ्याचे ठाणेदार आंनद पिदूरकर आणि तीन पोलीस कर्मचारी निलंबित आले आहे..
ठाणेदार यांना विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि पोलीस कारर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केले...
विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीला चिखलदरा येथील ठाणेदार यांची पोलीस मुख्यालय याठिकाणी बदली करण्यात आली...
जगाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी परभणीच्या सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्यावतीने परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे विश्व विक्रमी ३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.परवा म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी हा महायज्ञ होणार आहे तब्बल ७ एकर मध्ये ह्या ३१०५ महायज्ञ कुंडी तयार करण्यात आल्या आहेत एका यज्ञ कुंडीवर ४ जोडपे असे एकुण २४ हजार ८४० जणांकडून एकाच वेळी महागायत्री महायज्ञ होणार आहे.
सांगलीत नशेसाठी वापर होणाऱ्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मुख्य पुरवठादारास उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलीय. मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केलीय. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून इंजेक्शनचा मुख्य पुरवठादार इंतजार अली जहीरुद्दीन यास अटक केलीय. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. नशेसाठी वापर होणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा कोठून होतो, याचा तपास करताना सांगलीतील अशपाक पटवेगार हा मुरादाबाद येथील इंतजार अली जहीरुद्दीन याच्याकडून इंजेक्शन मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मुरादाबाद येथून इंतजार अली जहीरुद्दीन यास ताब्यात घेतले.
वाशिम- सध्या राज्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागत असल्याच दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज सह अनेक सरपंच माजी सरपंच आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिट्ठी देत उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे...काही दिवसा पूर्वी भोजराज यांनी आपल्या काँग्रेसपक्षाचा आपल्या विविध पदाचा राजीनामा देत पक्षआणि पक्षातील नेत्यावर नाराजी दाखवत राजीनामा दिला होता ...आता भोजराज हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याने वाशिम शिवसेनेची ताकत वाढणार आहे..
गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सखोल तपासणी केली जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर एक संशयित व्यक्ती आढळून आला... त्यामुळे चौकशी केली असता तो घाबरला आणि समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. संशय बळावत त्याला आरपीएफ चौकी गोंदिया येथे आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या जॅकेटमधून एक पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, 3000 रुपये, एक पर्स व ड्रायव्हिंग लायसन्स, एक लायटर व विवो कंपनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला. आरोपी आकाश साळवे, वय 29 वर्षे, राजेंद्रनगर, जिल्हा-रायपूर, छत्तीसगड असून यापूर्वी त्यावर रायपूर पोलिस स्टेशनमध्ये अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. सदर पिस्तूल व इतर साहित्य जप्त केल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जीआरपी गोंदियाकडे सुपूर्द करण्यात आले.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथील रूम नंबर 313 ला सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती .
ही आग एसीला लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .
घटनास्थळी मुंबई महानगरपालिकेची अग्निशामक दलाचा एक बंब दाखल होताच आज आटोक्यात आली आहे.
या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला आहे .
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधील वाढलेल्या बिबट्यालचा वावर शेतकरी आणि नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे...यावर चार दिवसांत उपाययोजना न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय...पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर ,कर्जुले हर्या, पोखरी, वासुंदे या गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.. मागील पंधरा दिवसांपूर्वीच खडकवाडी या ठिकाणी एका शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता... या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला होता...तर देसवडे येथे देखील शेतकरी योगेश गोळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते देखील गंभीर जखमी झाले होते... या परिसरात सतत बिबट्याचे हल्ले होत असल्याने शेतकरी आणि गावकरी भयभीत झाले असून शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये पाणी धरण्यासाठी देखील जाता येत नाही... यामुळे शेती करायला देखील कठीण झालं आहे...बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची भेट घेऊन चार दिवसात बिबट्यांचा योग्य तो बंदोबस्त करून नागरिकांची बिबट्या पासून होणाऱ्या हल्ल्यातून सुटका करावी...अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडील 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
आयकर विभागाची सलग तिसऱ्या दिवशी संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरी कारवाई सुरूच
काल रात्री साडेअकरा पर्यंत चौकशी केल्यानंतर आज पुन्हा एकदा चौकशी सुरू
बुधवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे अधिकारी संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखेही लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहे.
सहा वाजेनंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या असे आदेश हायकोर्टने निवडणूक आयोगाला दिले असून यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे आपण स्वागत केले पाहिजे. कोर्टाला देखील आश्चर्य वाटलं की 6 वाजेनंतर महाराष्ट्रात 75 लाख मतदान अचानक झालं आहे. आता हे मशीनने केले आहे, की कोणी केलं आहे हे बघावं लागेल. तसेच ईव्हीएम मशीनला कैलिब्रेट करून मतदान हे भाजपा आणि मित्र पक्षाला गेलं आहे अशी शंका असल्याने आम्हाला मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही मिळावं अशी मागणी आम्ही हायकोर्टच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला करणार आहोत असं रोहित पवार म्हणाले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर