Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 16 Feb 2025 02:50 PM
नागपूर जिल्ह्यातील कोतवालबड्डी येथील एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट; दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत कोतवालबड्डी येथे एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट... 


दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती...


दुपारी दोन वाजताची घटना...


कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत कोतवाल बड्डी येथे एका खाजगी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये फटाक्यांसाठी ची बारूद तयार केली जात होती...


दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी स्फोट झाला त्यामध्ये दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे...

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. तर
धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठलीय. त्यावर भेटीचं बातमी फोडणं हे आपल्याविरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धसांनी दिलाय... यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचही त्यांनी सांगितलंय. शिवसेना ठाकरे पक्षात सध्या चिंतेचं वातावरण आहे. कोकणात राजन साळवी, पाठोपाठ सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी यांनी शिंदेंचं शिवधनुष्य हाती धरलं. पाठोपाठ भास्कर जाधवांनीही खंत व्यक्त केली. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतेचं वातावरण आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स...

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.