Maharashtra Breaking 10th July LIVE Updates: राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 10 Jul 2024 10:50 AM
Beed News: मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली

Beed News: बीड: मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली; रॅलीला परवानगी मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या कामामुळे चौकात सभेसाठी परवानगी नाही


मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. आणि काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे. समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.

Beed News: मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली

Beed News: बीड: मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली; रॅलीला परवानगी मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या कामामुळे चौकात सभेसाठी परवानगी नाही


Ac: मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. आणि काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे. समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.

Maharashtra News : मराठा समाजासाठी मी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली : धनंजय मुंडे

मराठा समाजासाठी मी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली : धनंजय मुंडे


'समाजात बुद्धीभेद करत सामाजिक सलोखा बिघडवू नका' : धनंजय मुंडे

Konkan Railway Disturb: पेडणे बोगद्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी; कोकण रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प

Konkan Railway Disturb: पेडणे बोगद्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने कोकण रेल्वे सेवा सध्या पूर्णपणे ठप्प आहे. मुंबई ते मडगाव यादरम्यान धावणाऱ्या जवळपास 13 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर 15 एक्सप्रेस इतर मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे.

Marathwada Earthquake: मराठवाड्यात 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के

Marathwada Earthquake: हिंगोली, परभणी, नांदेड,  जालना आणि विदर्भात वाशिम याठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली लगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाची तीव्र झटके जाणवले सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर बाहेर पडले. हिंगोलीत वसमत कळमनुरी, औंढा, नागनाथ आणि सेनगाव या पाचही तालुक्यात धक्के जाणवलेत. हिंगोलीत 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झालीये. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. परभणी सेलू गंगाखेड या भागात भूकंपाचा धक्का जाणवला. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी; राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात काय याची उत्कंठा

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी


राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात काय याची उत्कंठा


10 जुलैपर्यंत भूमिका मांडण्याचे कोर्टाचे 3 जुलै रोजी आदेश


याचिकाकर्त्यांच्या एकमतानंतर राज्य मागासवर्ग आयोग प्रतिवादी


मराठा आरक्षणाविरुद्धच्या आव्हान याचिकांवर हायकोर्टात सुनावणी


आयोगाच्या भूमिकेनंतर प्रत्यक्ष नियमित सुनावणी ठरणार

Mumbai News: राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी

Mumbai News: राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी


रमेश कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


कदम हे 21 जून रोजी त्यांच्यावर दहिसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावनीसाठी सत्र न्यायालयात आले असताना घडला प्रकार


रमेश कदम यांच्याकडे पाहून चव्हाण यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'तू जे पैसे खाले त्यातील 10 कोटी मला दे, नाहीतर जेलमधून तू कधीच सुटणार नाही.  असे धमकावले


रमेश कदम यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी कुलाबा पोलिसांनी प्रवीण चव्हण यांच्या विरोधात 384, 506 भादवी कलमासह 3(1) आर, 3(1) एस, अ जा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणी कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Nagpur News: आगामी विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मतदान केंद्र

Nagpur News: आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी यंदा नागपुरातील 200 पेक्षा जास्त फ्लॅट्स असलेल्या टाऊनशिपमध्ये विशेष मतदान केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे. त्यासाठी त्या टाऊनशिपच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


लोकसभा निवडणुकीत नागपूर शहरातील काही मतदार केंद्रावर 1400 तर काही मतदान केंद्रावर फक्त 400 मतदारांची नोंद होती... त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची सारखी मतदार संख्या करण्याचा ही प्रयत्न राहणार असल्याचे इटनकर म्हणाले.


लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात फक्त 54 टक्के मतदान झाले होते. कमी मतदानासाठी मतदार यादी मधील चुकांना कारणीभूत धरण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी मधील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Nashik News: मालेगाव : मालेगांव तालुक्यातील मेंढपाळ बांधव आक्रमक

Nashik News: मालेगांव तालुक्यातील मेंढपाळ बांधव हा पाउस पडल्यानंतर  ज्या ज्या ठिकाणी शासकीय मालमत्ता असेल त्या त्या ठिकाणी मेंढया चारण्याचे काम करतो. परंतु मालेगाव तालुका परिसरातील ज्या काही गायराण जमिनी आहे त्या परिसरातील काही लोकानी ताब्यात घेतल्या मुळे व वन विभागाने जंगल ताब्यात घेतल्यामुळे हया मेंढपाळाना मेंढ्या चारण्या करीता व त्यांचा पारंपारीक व्यवसाय जपण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे..त्यामुळे येत्या 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तहसिल कार्यालयामध्ये आम्ही मेंढ्या,बैलगाड्या, घोडे, कुत्रे आमचा संपुर्ण परिवार घेवून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मेंढपाळ बांधवांनी दिला.

Nashik News: मालेगाव : पंढरपूर वारीत पार पडला सायकलिंगचा रिंगण सोहळा

Nashik News: मालेगाव सायकलिंग क्लबने तीन दिवसांत पंढरपूर वारी केली..या वारीची सुरुवात मालेगाव येथून झाली. मालेगाव ते पंढरपूर हा 400 किलोमीटरचा प्रवास या सायकलिंग क्लबने नगर, पंढरपूर असा तीन दिवसात पूर्ण केला. वारीत महत्वाचे ठरते ते रिंगण. या सायकलिंग क्लबसह संपूर्ण महाराष्टाचे सायकल संमेलन तसेच पंढरपूर नगर फेरी आणी सायकलिंग चा रिंगण सोहळा झाला पंढरपुरात पार पडला. राज्यभरातून 2000 च्या आसपास सायकलिस्ट पंढरपुरात दाखल झाले होते. अत्यंत आनंदी वातावरण मालेगाव ते पंढरपूर अशी सायकल वारी उत्साहात आनंदात पार पडली. 

Nagpur Crime : नागपुरातून एका घरातून वन्य प्राण्यांचे अवयव जप्त

Nagpur Crime : नागपूर जिल्ह्यातील काटोल वनपरिक्षेत्र परिसरात वन अधिकाऱ्यांच्या पथकाने एकाच घरातून अनेक वन्य प्राण्याचे अवयव जप्त केले. यात बिबट्याची कवटी, 15 नख, बिबट्याचा मिश्या, चिंकाऱ्याचे पाच शिंग जप्त करत आरोपिला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव श्रीकांत किसन दुपारे असून त्याच्या घरातून अवयवासह शिकारीसाठीचा साहित्य जप्त करण्यात आल्यानंतर आरोपीला पाच दिवस वनकोठडीत पाठवले आहे.

Parbhani News : दोन महिन्यानंतर परत एकदा परभणी, नांदेड, हिंगोलीसह वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Parbhani News : दोन महिन्यानंतर परत एकदा परभणी नांदेड हिंगोली सह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचा धक्का जाणवला आहे आज सकाळी सात ते सात वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान परभणी 2 धक्के जाणवले तसेच याच दरम्यान हिंगोली नांदेड जालना सह वाशिम जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथला असून.हा धक्का जाणवल्यानंतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोक घराबाहेर पडले घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यात भूकंप; आखाडा बाळापूर भूकंपाचं केंद्र

Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के 


भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर 


7.14 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले असून हिंगोली जिल्ह्यात सर्व दूर हा भूकंप जाणवला आहे. 


परभणी जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 


7 वाजून 15 मिनिटांनी जाणवला धक्का 


परभणी सेलू गंगाखेड आदी भागात जाणवला धक्का 


अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन आले बाहेर

Maharashtra News: ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, नेमकी चर्चा काय झाली?

Maharashtra News: ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीत नेमकं काय झालं त्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, असा सूर ओबीसी नेत्यांचा होता. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल, त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ही थांबवा अशी मागणी काही ओबीसी नेत्यांनी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी मागण्या ऐकून घेतल्या. 

Vidhan Parishad Election : राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वपक्षीय फाईव्ह स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग

Vidhan Parishad Election : राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वपक्षीय फाईव्ह स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय. आमदार कोट्यातून होणाऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होण्याच्या भीतीनं भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमधून ठेवण्याचा निर्णय घेतलाय. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक 12 जुलैला होणार आहे. त्यासाठी महायुतीकडे एकूण 200 तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत.

Ramesh Gowani Arrested : मुंबईतील कमला मिल्सचे मालक रमेश गोवानीला अटक

Ramesh Gowani Arrested : मुंबईतील कमला मिल्सचे मालक रमेश गोवानीला अटक

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रमेश गोवानीला अटक


मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गोवानीला अटक

Worli Hit And Run : वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

Worli Hit And Run : मुंबईतल्या वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला तब्बल 60 तासांनंतर विरारमधून अटक करण्यात आली. मिहीर विरारमधल्या एका फ्लॅटमध्ये लपून बसला होता असं समजतं. मिहीर शाहाला मदत करणारी त्याची आई आणि त्याच्या दोन बहिणींसह एकूण 12 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या एकूण आठ टीम मिहीरचा शोध घेत होत्या. कावेरी नाखवा या महिलेच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेला मिहीर रविवारी पहाटेपासून फरार होता. त्याचे वडील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांना आणि बीएमडब्ल्यू कारमध्ये मिहीरच्या शेजारी बसलेला राजऋषी बिडावतला पोलिसांनी रविवारीच अटक केली होती. 

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. पटोले यांनी एमसीएच्या कार्यालयाला काल भेट देऊन ही निवडणूक लढवण्यासाठीची नियमावली समजून घेतली. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माझगाव क्रिकेट क्लबनं नाना पटोले यांचं नाव प्रतिनिधी म्हणून आधीच पाठवलं आहे. पण प्रत्यक्षात ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाहीत, याबाबतचा अंतिम निर्णय आजच अपेक्षित आहे. अमोल काळे यांच्या निधनानंतर एमसीएचं अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळं एमसीएच्या अध्यक्षपदासाठी येत्या 23 जुलै रोजी निवडणूक होत असून, त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याची मुदत 16 जुलै रोजी संपत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर, प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी


2. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय, मागच्या बैठकीत काय झालं, ते अधिवेशनात सांगण्याची विरोधकांची मागणी


3. महाराष्ट्र पेटता राहावा असे मविआचे धोरण आणि भूमिका, विरोधकांची आपली राजकीय पोळी भाजण्याची भूमिका उघड, ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्र्यांची टिका


4. निवडणुकीच्य बैठकीसाठी त्यांच्याकडे वेळ आहे, मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला विरोधकांना वेळ नाही, खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


5. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री लिहीणार पत्र,  मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात पक्षाची भूमिका कळवण्याची विनंती करणार, प्रविण दरेकर यांची माहिती


6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक घेणार, विधानपरिषदेच्या निवडणूकीसंदर्भात करणार मार्गदर्शन, ताज लँड्समध्ये बैठक


7. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 60 रुम्स बुक


8. पुढील तीन दिवस भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार, विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मक्कामी


9. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पक्षाकडून खबरदारी


10. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्याबाबत मला कोणीही भेटलं नाही, पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे, शरद पवारांचं वक्तव्य

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.