Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील हवामान आणि पावसाची स्थिती काय, जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Breaking LIVE Updates Today 6th June 2025: किल्ले रायगडावर आज 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींचीही उपस्थिती.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी विलीन होणार का या प्रश्ना इतकीच चर्चा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाची होत असते. राष्ट्रवादीचा निर्णय पुढची पिढी घेईल म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार ठरवतील असं उत्तर शरद पवारांनी देऊन झालंय. सेना आणि मनसेमध्येही पुढची पिढी एकीकरणाच्या प्रश्नावर बोलू लागली आहे. आदित्य उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठा अमित राज ठाकरेंनी आज ठाकरे एकीकरणाच्या शक्यतेवर भाष्य केलं.
वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे वादात अडकलेले, वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर. अमरावती तुरुंगातील एका प्रकरणामुळे अडचणीत आलेत. पुण्यातील कुप्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश, हे दोघे हुंड्यासाठी सुनेच्या छळाप्रकरणी अमरावती तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून सुपेकरांनी गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे आणि सासरे दीपक साळुंखेंच्या सांगण्यावरून, मांडवलीसाठी साडेपाचशे कोटींची मागणी केली होती. असा आरोप गायकवाडांचे वकील निवृत्ती कराडांनी केलाय. तशी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलीय. याचिकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे, त्यांची मुलगी आणि गणेशची पत्नी मुक्ता साळुंखे, जालिंदर सुपेकर, अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलंय. सुपेकरांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत.
आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सनं कमी केला
रेपो रेट ५.५ टक्क्यांवर
कर्जाचा व्यजदरात कपात होणार
पॉलिसी रेपो रेट आता जवळजवळ ३ वर्षांतील सर्वात कमी पातळीवर
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांकडून आंदोलन
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे
केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे
मात्र प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने वारकऱ्यांनी झाडावर चढून टाळ वाजवून हरिनामाचा गजर करत आंदोलन सुरू केले आहे
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धांदल उडालीय
केशव महाराज गित्ते आणि शांताबाई पळवदे यांचे उपोषण सुरू आहे
अग्निशामक दलाचे जवान देखील याठिकाणी दाखल झाले आहेत





















