Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
MI vs PBKS Qualifier 2 : श्रेयस अय्यरने केला मुंबई इंडियन्सचा गेम, पंजाब किंग्ज 11 वर्षानंतर आयपीएल फायनलमध्ये
इंडियन प्रीमियर लीगला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे. आयपीएल 2025 च्या हंगामाच्या अंतिम फेरीत, असे दोन संघ आमनेसामने येणार आहेत, ज्यांनी आजपर्यंत कधीही विजेतेपद जिंकलेले नाही. मंगळवार 3 जून रोजी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला.
घटस्फोटित गर्लफ्रेंडच्या नादात निलेश चव्हाण सापडला?
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉलही महत्त्वाचा ठरला. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला. फेसटाईम कॉलिंगचे आयपी अडड्रेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या.
संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावहून पंढरपूरच्या दिशेने रवाना
विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून ओळखला जाणाऱ्या संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालीय. या पालखीचं यंदा ५६ वं वर्ष आहेय. सकाळी शेगावहून निघालेल्या या पालखी नागझरीमार्गे अकोला जिल्ह्यात प्रवेश केलाये. पालखीचा आजचा मुक्काम पारस येथे आहेय. तर उद्या भौरद येथे मुक्काम केल्यानंतर पालखी अकोल्यात प्रवेश करणारेय.
ठाण्याच्या काही भागात मंगळवारी पाणी पुरवठा बंद; टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभालीची कामे होणार
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, ०४ जून रोजी स ९.०० ते रा. ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.






















