Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
एअर इंडिया नफा मिळवण्यासाठी प्रवाशांचे जीव धोक्यात घालतं; माजी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप
एअर इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. 14 मे 2024 रोजी मुंबई-लंडन फ्लाईट लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पोहोचल्यावर त्याच्या दरवाजात दोष आढळला. त्याबद्दल आम्ही लेखी तक्रार दिली. मात्र आम्ही ही तक्रार मागे घ्यावी यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला, आणि जेव्हा आम्ही तसं करण्यास नकार दिला, तेव्हा आम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, असा आरोप त्या विमानातील दोन फ्लाईट अटेण्डंट्सनं केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज मुंबई दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार आहेत.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात, नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंग्लेमध्ये पहिली कसोटी, इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यानं भारताला विजयाची संधी...
चोर समजून अनोळखी युवकाला बांधून मारहाण, नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली; महिनाभरानंतर उलगडा, चार आरोपीना अटक
नांदेड: चोर समजून ग्रामस्थानी एका 24 वर्षीय युवकाला मारहाण केली. बेदम मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली आणि पुढे तपासाला गती आली. नांदेड मधील हा सर्व घटनाक्रम आहे. उमरी तालुक्यातील धानोरा येथे 10 मे रोजी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पंधरा दिवस उलटले तरी युवकाची ओळख न पटल्याने तपास पुढे सरकत नव्हता. अखेर अत्यंत महत्वाच्या तपासात वापरली जाणारी नेटग्रीड प्रणाली पोलीस अधीक्षकांनी परवानगी घेऊन वापरली. नेटग्रीड मुळे युवकाचा तपास लागला आणि तो युवक हैद्राबाद मधील शेख फरदिन असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांचा शोध घेऊन पोलीसांनी तपासाला गती दिली तेव्हा धक्कादायक कारण समोर आले. 10 जून रोजी हैद्राबाद येथून तो युवक धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता. गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने ग्रामस्थानी त्याला हुसकावून लावले. पुढे तो एका आखाड्यावर गेला. या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याला चोर समजून बांधून मारहान केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी चौघाना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नेटग्रीडमुळे ओळख पटवणे शक्य झाले आणि पुढे तपास लागल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
शिवसेना, भाजप आणि आरपीआय सोबत लढणार; कर्जत मधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय
येणाऱ्या आगामी काळातील निवडणुका शिवसेना भाजप आणि आरपीआय सोबत लढेल मात्र राष्ट्रवादी सोबत कदापि कृती करणार नाही असा ठाम पवित्रा शिवसेनेचे रायगड कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलाय. कर्जत मधीलकाल झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये रायगड मध्ये शिवसेनेचे स्वबळ वाढण्यासाठी शिवसेना स्वबळावर लढावी यासाठी सुद्धा आम्ही तिन्ही आमदार एकवटले आहोत अस आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे ..


















