Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी

Maharashtra Rain Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 21 May 2025 01:49 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Today: राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Maharashtra Rain Upadates) हजेरी लावली असून मुंबई (Mumbai Rain) आणि पुण्याला (Pune Rain) चांगलेच झोडले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस...More

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; कॉलेज पसंती क्रमांक, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया  पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी


 राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया आज पासून सुरू होत आहे, सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणे अपेक्षित होते 


 आज पासून विद्यार्थ्यांना कॉलेज पसंती क्रमांक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे 


 मात्र ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये


 यावर शिक्षण संचालनालायकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे