Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी
Maharashtra Rain Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Rain Today: राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Maharashtra Rain Upadates) हजेरी लावली असून मुंबई (Mumbai Rain) आणि पुण्याला (Pune Rain) चांगलेच झोडले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. पुणे शहर आणि उपनगरामध्ये मंगळवारी संध्याकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासलासह अनेक भागात अधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्याने विविध अपडेट्स देखील समोर येताय. या सर्व घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; कॉलेज पसंती क्रमांक, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी
राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया आज पासून सुरू होत आहे, सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणे अपेक्षित होते
आज पासून विद्यार्थ्यांना कॉलेज पसंती क्रमांक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे
मात्र ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये
यावर शिक्षण संचालनालायकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे
व्यावसायिकाचे अपहरण करून आर्थिक वादातून खूनाचा कट, 24 तासांत पोलिसांकडून सुटका, तिघे अटकेत
Crime News: नवी मुंबईतील पंकेश पाटील या भाजीपाला निर्यात व्यवसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी २४ तासांत पंकेश ची पाटील यांची सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणी वाशीम येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. पंकेश पाटील यांचे एपीएमसी मधून तीन आरोपींनी धारदार शस्त्राने मारहाण करून अपहरण केले होते. स्वीफ्ट गाडीत टाकून नाशिक च्या दिशेने आरोपीने गेले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच. पोलीसांचे पथक आरोपींच्या मार्गांवर गेले. वाशिमच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी रस्त्यात आढवून पंकेश पाटील यांची सुटका केली. रुशिकेश इंगोळे , मंगेश अस्तरकर, सागर मानवर या तीन आरोपींना अटक केली असून आर्थिक वादातून हे अपहरण करण्यात आले होते.
























