Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा ZP राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, तर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 23 Mar 2026 12:33 PM

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहनपुणे : नाशिकमधील...More
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहनपुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरातबरोबर व्हायरल झाले आहेत. अशातच या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीरपुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यानं महेंद्र गायकवाड याला 4-3 असं पराभूत केलं. हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरीमधील सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीर याच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी त्यानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या वादावर अखेर पडदा....
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या वादावर अखेर पडदा.
सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप असा आमने-सामने सभागृहात दिसू नये.
दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची स्वतंत्र भेट घेतली.
शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची समन्वयकाची शिष्टाई पार पाडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्या नंतर उद्योग मंत्री उदय सामंत आणि चंद्रशेखर बावनकुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक करत आहेत.