Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) ऐनवेळी इच्छुकांची गर्दी (Rajya Sabha...More
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; 17 दुचाकीसह 25 लाखांचे साहित्य जप्त, 3 आरोपी अटकेत
Anc:बीड जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात होत्या. या कारवाईत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि साहित्य असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
बाईट: नवनीत कॉवत - पोलीस अधीक्षक बीड
युगेंद्र पवार आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळतात. योगेंद्र पवारांनी आज बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी संदर्भात जानाई शिरसाई योजनेची पाहणी केलीय.. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते या अनुषंगाने पाहणी दौरा केला आहे.. यावेळी जिरायती भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून समस्या देखील जाणून घेतल्या आहेत. यंदा जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई होऊ देणार नाही असं आश्वासन युगेंद्र पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलंय..ल
अजित पवार विमान अपघात प्रकरण
पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची भेट घेणार
विमान अपघात प्रकरणाबाबत चौकशी व्हावी ही कुटुंबीयांची इच्छा
सूत्रांची माहिती
अजित पवारांच्या अपघाताबाबत कुटुंबीयातील सदस्यांना देखील संशय.
अजित पवार विमान अपघात प्रकरण
पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची भेट घेणार
विमान अपघात प्रकरणाबाबत चौकशी व्हावी ही कुटुंबीयांची इच्छा
सूत्रांची माहिती
अजित पवारांच्या अपघाताबाबत कुटुंबीयातील सदस्यांना देखील संशय.
शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणुन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित न राहता अशा पद्धतीने शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग १९६८ साली सुप्रीम कोर्टात निवाडा झाला होता. यावेळी आरोग्यासह कुठल्या ही वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर संविधानाच्या कलम ८४ अ प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करण अनिवार्य असते. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधीमंडळात येऊन निवडणूक अधिकारी यांना सादर केला. पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष. खबरदारीचा उपाय म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत.
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भाजप विरोधात अर्धनग्न आंदोलन
मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याच्या आरोप करत आंदोलन
जिल्हा परिषदेत कुणबी मराठ्यांना अध्यक्षपद द्या या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मराठा समजावर राजकीय अन्याय केला असल्याची टीका
त्यामुळे महापालिकेत अडीच वर्षापैकी सव्वा वर्षे मराठा समाजाचा महापौर करा
तसेच जिल्हा परिषदेला कुणबी मराठ्यांना अध्यक्षपद द्या
अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी केली
भिवंडी शहरातील अनधिकृत पाणीपुरवठ्यावर अंकुश ठेवण्यासाठी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मोठी कारवाई केली आहे. नारपोली पोलीस स्टेशनसमोर असलेल्या चौथानी कंपाऊंड परिसरात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या पाणी कनेक्शनवर धाड टाकत मनपाच्या पथकाने पाइपलाइन तोडून टाकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या पाइप टाकून डाईंग आणि सायझिंग उद्योगांना पाण्याचा पुरवठा सुरू केला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मोठ्या प्रमाणात महसुल नुकसान होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही याच परिसरात एका गाळ्यातून ५ हजार लिटर क्षमतेच्या सात पाण्याच्या टाक्या जप्त करण्यात आल्या होत्या. या टाक्यांचा वापर अवैध पाणी साठवण आणि पुरवठ्यासाठी केला जात होता. ही कारवाई पाणी विभागाचे अधिकारी संदीप पटनावर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. दरम्यान, शहरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेऊन पाणीपुरवठा करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्या पाणी विभागाने दिला आहे.
शिंदे शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध!
दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याचा वेळ होता यामध्ये सात अर्ज दाखल करण्यात आले
भाजप ४
शिवसेना १
राष्ट्रवादी १
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -१
गोविंदगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी वारकरी धर्म परिषदेचा रास्ता रोको.
बुलढाणा-मलकापूर महामार्ग ठप्प.
ज्ञानोबा-तुकोबांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास यांच्या अटकेच्या मागणीसाठी वारकरी धर्म परिषद आक्रमक झाली आहे. मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथे बुलढाणा-मलकापूर महामार्गावर शेकडो वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास अर्धा तास चक्का जाम झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, गोविंदगिरी महाराजांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा वारकरी धर्म परिषदेने दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
माणगाव इंदापूर शहराजवळ वाहतूक कोंडी
वाहनांच्या 2 किमी पर्यंत रांगा
होळी सणानिमित्त मुंबई वरून गावी आलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास
माणगाव पासून ढालघर फाटा पर्यंत वाहनांच्या रांगा
नाशिक : आज महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्यभर ई-चलन विरोधात आंदोलन करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. खोटे व कोणत्याही पुराव्या शिवाय टाकलेले ई-चलन त्वरित सरकारने मागे घ्यावेत. 2017 पासून फक्त सरकार आश्वासन देते. मात्र, त्यांचे ई चलनद्वारे तिजोरी भरण्याचे काम चालू आहे, असा देखील आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या सर्व वाहनांसह मुंबई येथे धडक देऊ, असा देखील इशारा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवाराचे नाव अजूनही अधिकृत घोषित नाही
नावाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम
विधानभवनात खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यात बैठक सुरू
शिवसेना धक्का तंत्र देण्याच्या तयारीत?
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून 2 उमेदवार देण्याची चाचपणी
शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता
शिवसेने कडून ज्योती वाघमारे,रोहित टिळक, राहुल शेवाळे,शायना एन सी या चार नावांवर अद्याप चर्चा सुरु.
अशातच ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावं आघाडीवर
बीड: केज-कळंब रोडवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडलीय. साळेगावजवळील चिंचोली पाटीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कोल्हापूर-माजलगाव बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, बसची एक बाजू पूर्णपणे खराब झाली आहे. या अपघातात एसटी चालक-वाहक आणि प्रवासी असे एकूण तेरा जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नाशिक: वणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आधी वणी नंतर झिरो नंबरने नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाणे येथे पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे दानीश रईस शेख हा फरार असल्याने वणी शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी वणी पोलिस ठाणे येथे निषेध मोर्चा काढत आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या निषेध मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपकडून ७ आणि ८ मार्च रोजी नगरसेवकांच प्रशिक्षण वर्ग
वसंत स्मृती कार्यालयात नगरसेवकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन
महानगरपालिकेत प्रभावीपणे काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केलं जाणार
नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार
जनतेची कामे पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा कसा करावा यावर भर दिला जाणार आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी कामकाजासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार
त्याच बरोबर आगामी काळात अनधिकृत फेरीवाला आणि बांगलादेशी रोहिंग्याबद्दल काय काळजी मतदारसंघात घ्याल, त्यावर उपाय करण्यावर कसा भर देण्यात येणार , यांचही प्रशिक्षण वर्गात माहिती दिली जाणार
भंडारा: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा परिणाम केवळ जागतिक राजकारणावरचं नाही, तर आता थेट भंडाऱ्याच्या सामान्य शेतकऱ्यांच्या खिशावरही होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा विस्कळीत झाल्यानं भंडाऱ्याचा भेंडी, लावली आणि अन्य भाजीपाला आता परदेशात जाण्याऐवजी मातीमोल भावात स्थानिक बाजारात विकला जात आहे. भंडारा जिल्हा... ज्याला आपण भाताचं कोठार म्हणतो, इथला शेतकरी आता प्रयोगशील झाला आहे. भंडाऱ्याच्या बीटीबी (BTB) मार्केटमधून दररोज २० ते २५ टन भेंडी, लौकी (दुधी भोपळा) आणि इतर पालेभाज्यांची विमानानं मुंबईवरून थेट दुबई आणि कतारला निर्यात केली जात होती. मात्र, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळं परदेशात जाणारी विमान सेवा सध्या ठप्प आहे. या युद्धाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो इथल्या बागायतदार शेतकऱ्यांना. जो भाजीपाला डॉलरमध्ये कमाई करून देत होता, तो आता निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल भावानं विकावा लागत आहे. विमान सेवा बंद असल्यानं निर्यातीची साखळी तुटली असून, लाखो रुपयांचं नुकसान या छोट्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोसावं लागत आहे. आता ही विमान सेवा कधी पूर्ववत होते आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला पुन्हा कधी उड्डाण घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बीड : जिल्ह्यात 1179 पोलीस पाटील पदासाठी परीक्षा पार पडल्यानंतर उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती होत आहेत. पोलीस पाटील पदासाठी होणारी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. एजंट मार्फत दिल्या जाणाऱ्या आमिषावर प्रशासनाचे लक्ष आहे. कोणत्याही उमेदवाराने अमिषाला बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा पार पडली. यात 10886 उमेदवाराने ही परीक्षा दिली. आता यानंतर प्रत्येक उपविभागीय स्तरावर मुलाखत प्रक्रिया पार पडत आहे. आष्टी तालुक्यात 246 जागांसाठी 819 उमेदवार पात्र असून यात उच्चशिक्षित उमेदवाराचा समावेश आहे. त्यामुळे आता यापुढे गाव स्तरावर उच्चशिक्षित पोलीस पाटील दिसून येणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा पार पाडली जातेय.
वसई : वसईच्या तुळींज पोलीस ठाण्यात भाजपाचे नगरसेवक गणेश पाटील यांच्याविरोधात राहुल गांधींबाबतच्या वक्तव्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी रोजी नालासोपारा पूर्व येथील राधाकृष्ण हॉटेलसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत कथित वक्तव्य केलं होतं.
या प्रकरणी वसई-विरार काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष रतन तिवारी यांनी तुलिंज पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भाजप नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गणेश पाटील यांच्यावर 27 फेब्रुवारी रोजी राजकीय वैमनस्यातून बविआच्या एका कार्यकर्त्याला कार्यालयात बोलावून मारहाण केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाणे येथेही गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपकडून प्रमुख नेते आणि आमदारांना एसआयआरचे प्रशिक्षण
आज विधीमंडळातील भाजप पक्ष कार्यालयात प्रशिक्षण शिबिर
भाजप नेते किरीट सोमय्या मार्गदर्शन करणार
स्पेशल इंटेन्स रिव्हिजन (एसआयआर) अर्थात 'विशेष सखोल फेरतपासणी'
मतदारयाद्यांशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया
महाराष्ट्रात १ एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न
विधान परिषदेचं कामकाज पुन्हा अर्धा तासासाठी तहकूब
विशेष बैठकीसाठी मंत्र्यांची उत्तरं देण्यासाठी उपस्थिती नसल्याने कामकाज स्थगित
याआधी मंत्री प्रश्नोत्तरासाठी उपस्थित नसल्याने कामकाज केले होते 10 मिनिटांसाठी स्थगित
भाजपचे राज्यसभेचे सर्व चारही उमेदवार दुपारी 12:30 वाजता अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार
भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया ईवनाते अर्ज दाखल करणार
मुंबई : राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याबाबतच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सरकारला धारेवर धरणार आहे. अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून ते हा मुद्दा पुन्हा सभागृहात उपस्थित करणार आहेत. स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण अस्तित्वात असले तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. उद्योग व्यवस्थापनावर सरकारचा धाक उरलेला नाही, असा आरोप करत स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी
आज विधानसभेत अशासकीय ठरावाद्वारे सरकारचे वेधणार लक्ष
राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी
डाॅलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी मजबूत
काल रुपया ९२.१५ प्रति डाॅलरवर बंद झाला होता
आजचा व्यवहार सुरु होताना रुपया प्रति डाॅलर ९१.५७ वर उघडला
कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसते आहे
अशातच, रुपया डाॅलरच्या तुलनेत घसरल्याचे चित्र होते
मात्र, आज पुन्हा एकदा डाॅलरच्या तुलनेत रुपयाने चांगली सुरुवात केली
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांची वाढ
कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ८४ डॉलरपर्यंत पोहोचले
धुळे : तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी साहेबराव एकनाथ ठाकूर यांच्या शेतात असलेल्या चिंचेच्या झाडावर घोडं मवाय म्हणून मोठ्या माश्याचे मोठे पोळे(घर) होते. त्यास काहीतरी धक्का लागला असल्या कारणाने माश्या बिथरल्या आणि शेतात काम करीत असलेले साहेबराव ठाकूर यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात शेतकरी साहेबराव ठाकूर गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पुण्यात वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत २५ हजार रुपये ऑनलाइन खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.
गणेश अण्णा जगधने (वय २९), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२), अतुल रवींद्र गायकवाड (वय ३८) आणि संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत जहाँगिरपूर (बिहार) येथील व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र पुणे रेल्वे स्थानक परिसरातून निघाले असता,आरोपी रिक्षाचालक जगधने आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले.
वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची मागणी करत त्यांनी फिर्यादीच्या मित्राला मारहाण केली.त्यानंतर त्याच्या पत्नीकडून ऑनलाइन २५ हजार रुपये मागवून घेतले.
पैसे मिळाल्यानंतर आरोपी रिक्षासह पसार झाले.या घटनेनंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली असून,अशा प्रकारे या आरोपीनी अजून कुणाला फसवलं आहे का,किंवा त्यांची लूट केले आहे का,याचा तपास केला जात आहे.
साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या ओझर्डे धबधबा परिसरात रानगव्याने तलाठ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून पाटण तालुक्यातील नवजा येथील अजय जाधव हे तलाठी गंभीर जखमी झाले आहेत. तलाठी अजय जाधव हे शासकीय कामकाज उरकून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात होते. ओझर्डे धबधबा परिसरात अचानक एक रानगवा दुचाकी गाडीसमोर आडवा आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोटारसायकल थांबवली. याच दरम्यान झुडपातून दुसरा रानगवा अचानक बाहेर येत त्यांच्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. या धडकेत ते मोटारसायकलवरून खाली पडले असून पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
पुणे: बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला सुमारे 75 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला. या कारवाईत 745 ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पुणे : आर्थिक वर्ष 2026-27 साठी पुणे शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी 8 ते 10 टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात 5 ते 7 टक्क्यांपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही दरवाढ सुचवली असून राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यास 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. दरवाढीमुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवरील स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील MIT एडीटी कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!
लेकीचा छळ करणाऱ्या हुल्लडबाजाला कॅम्पसमध्येच लोळवले
मुलीला त्रास देणाऱ्याला बापाने दिला चोप
पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठाच्या आवारात आज पालकांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने आज कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाल्याचा प्रकार समोर आला.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून पीडित तरुणीला ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. आज तो विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आला असता, वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावले, ज्याचे रूपांतर वादात झाले.
ठाण्यातील बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व कॅसिनो बंद करा
भाजप आमदार निरंजन डावखरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी व कॅसिनोचे धंदे
शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा दावा
विनलक्की कॅसिनो व साईकृपा नावाने ऑनलाईन लॉटरी
निरंजन डावखरेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री काय आदेश देणार? याकडे लक्ष
Mumbai News: आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा
सकाळी पावणे बाराच्या दरम्यान हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे
वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, खेळाडू या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती
मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
मुंब्रा-कळवा दरम्यान गर्दीमुळे कोसळून एका विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू
बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
गर्दीतील वादामुळे एका शिक्षकाची लोकलमध्येच झाली होती हत्या
सर्वपक्षीय आमदारांकडून उपस्थित लक्षवेधीमुळे वातावरण तापण्याची शक्यता
गेल्यावर्षी रेल्वेच्या ४ हजार ८९१ अपघातात २८७ प्रवाशांचा मृत्यू
Mumbai News: आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा
सकाळी पावणे बाराच्या दरम्यान हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे
वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, खेळाडू या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती
Sangli News: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड 18 मार्च रोजी होणार आहे. निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापनेसाठी युती, आघाडीतील नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने अजून भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीचा कार्यक्रम लांबला होता. त्यामुळे इच्छुक सदस्यांसह नेतेमंडळींमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक 20 मार्चपूर्वी घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने दि. 25 रोजी जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या. पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी 10 मार्च रोजी विशेष सभा बोलवण्याचे आदेश काढले आहेत.
Mumbai News: वर्सोवा–दहिसर–भाईंदर किनारारस्ता प्रकल्पासाठी तब्बल 46 हजार खारफुटी बाधित होणार.
प्रकल्पाचा मोठा भाग सागरी किनारपट्टी व कोंदळवन क्षेत्रातून जात असल्याने खारफुटी हटवावी लागणार.
यापैकी सुमारे 9 हजार झाडे पूर्णतः तोडली जाणार, तर उर्वरित 36 हजार झाडे अंशतः बाधित.
बाधित खारफुटींच्या बदल्यात तिप्पट लागवड मीरा-भाईंदर व पालघर परिसरात केली जाणार
या पुनर्लागवडीसाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी वितरित.
मंत्रालय (भारत सरकार), महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण व उच्च न्यायालयाची प्रकल्पाला परवानगी.
न्यायालयाने पुनर्लागवड व पर्यावरणीय अटींचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
पर्यावरणवाद्यांकडून तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा.
वन विभागाच्या कोंदळवन कक्षामार्फत खारफुटी हटविण्याची प्रक्रिया.
किनारारस्ता पूर्ण झाल्यानंतर काही झाडे त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्याचा दावा प्रशासनाचा.
Maharashtra Wether Updates: पुढील तीन दिवस कमाल तापमान वाढलेलेच राहण्याचा अंदाज. मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता.
गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
या भागातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आज तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असली तरी ८ मार्चपर्यंत कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनमधून उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत असून त्यामुळे कोकण पट्ट्यात तापमानात वाढ झाली आहे.
Mumbai News: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) कथित 65.5 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी एस्प्लनेड न्यायालयात सुमारे 7000 पानी दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
यात अटक आरोपी महेश पुरोहित आणि सुनील उपाध्याय यांची नावे असून 39 साक्षीदारांचा समावेश आहे.
तपासानुसार, आरोपींनी अनेकांच्या नावाने बनावट MoU तयार करून डंपिंग ग्राउंडसाठी खोटे कागदपत्र सादर केले आणि त्यावर आधारित देयके मिळवली.
2013 ते 2023 दरम्यान BMC च्या पावसाळी नाले विभागातील काही अधिकाऱ्यांनी कंत्राटदार व मध्यस्थांशी संगनमत करून बनावट कागदपत्रे, वजन काटा पावत्या व लॉगशीट वापरून देयके मंजूर केल्याचा आरोप आहे.
तसेच 2021–2024 दरम्यान काही अधिकाऱ्यांनी निवडक कंत्राटदारांना फायदा व्हावा म्हणून टेंडर अटी बदलून गाळ काढण्याचे दर कृत्रिमरीत्या वाढवले, ज्यामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणात यापूर्वी मध्यस्थ केतन कदम, जय जोशी आणि कंत्राटदार शेरसिंग राठोड यांनाही अटक करण्यात आली असून तपास अद्याप सुरू आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल