Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर

Maharashtra Breaking Live Updates: राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. 

मुकेश चव्हाण Last Updated: 19 Feb 2025 01:49 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking Live Updates: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न...More

पिंपरीत आगळी-वेगळी शिवजयंती, छावा चित्रपटाचे मोफत शोचं आयोजन

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधत छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वदूर पोहचावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी यासाठी हजेरी लावली. अजित पवारच्या राष्ट्रवादीने याचं आयोजन केलं होतं, यानिमित्ताने छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी करण्यात आली.