Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यातील आणि देशातील या ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई...More
सातारा - पुणे बंगळूरु महामार्गावर बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक पेट घेतला आहे मात्र सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र.या आगीत गॅस टँकर जळून खाक झाला आहे.या घटनेच्या ठिकाणी धुराचे लोट आणि अग्नीच्या ज्वाळा यामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुणेच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने बोपेगाव पुला शेजारी अचानक पेट घेतला.पहाता पहाता आगीचे रुद्र रूप आणि ज्वाळा धुराचे लोट यांनी भयानक परिस्थिती निर्माण झाली पण त्याही वेळी चालक यांनी टँकर रस्त्याच्या बाजूला सेवा रस्त्यावर घेत मदतीला इतर लोकांना बोलवू लागले सुदैवाने सदर टँकर रिकामा होता त्यामुळे मोठी होणारी दुर्घटना टळली तरी सुद्धा अग्निशमन गाडी येईपर्यंत टँकर जळून खाक झाला होता.या महामार्ग पोलीस केंद्र जोशीविहिर येथे अग्निशमन विजवणारी यंत्रणा असावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे मात्र आणेवाडी टोलनाका व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल गोवा मेडिकल कॉलेज मध्ये अचानक भेट देत, त्यांच्या जवळ आलेल्या तक्रारींवरून गोवा मेडिकल कॉलेज च्या कॅज्युल्टी विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबन केलं होत. या प्रकरणी मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा. त्यानंतर तुर्तास डॉ. कुट्टीकरांच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगित देण्यात आली आहे. ह्या प्रकरणात सर्वांसोबत सखोल चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे: मंगळवारी पक्षाचा वर्धापन दिनानिमित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार असून याची तयारी करण्यासाठी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. मंगळवारी वर्धापन दिनानिमित्त राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार असून त्यांच्यासाठी तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळ महानगरपालिका निवडणुकांचा असल्यामुळे शरद पवारांच्या भाषणाकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.
विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचे प्रत्युत्तर
सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली, जनता मस्ती उतरवण्याचं काम करेल
भाजपला राष्ट्र प्रथम या विचाराचा विसर पडला
आमच्या सोबत आले तरच निधी हा लोकशाहीचा खून, अशा वृत्तीला ठेचायला हवं
जनता ही सगळ्यांचा बाप असते त्याचा विसर पडू नये, जनता धडा शिकवीन
नितेश राणेंना धाराशिव मध्ये घर बांधून द्या जाण्या-येण्याचा त्रास नको, जनतेचे प्रश्न त्यांना किरकिर वाटत असेल तर ते आम्ही करणार
भाजपचे मंत्री नितेश राणेंना ओमराजे निंबाळकरांकडून प्रतिउत्तर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी
Beed News : बीडच्या केज तालुक्यातील सासुरा येथे असलेल्या संत एकनाथ महाराज मठ संस्थानच्या वादातून उत्तरअधिकारी असलेल्या केशव महाराज शास्त्री यांना या मठाचे अध्यक्ष व सचिव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
केशव महाराज शास्त्री यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. हे उपोषण केल्याचा राग मनात धरून संस्थानचे अध्यक्ष रतन महाराज मुंडे,सुसेन भोसले, राजेन भोसले तसेच ज्ञानेश्वर भोसले यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केशव महाराज शास्त्री यांनी दिली होती त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडावर चढत या संस्थांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी आंदोलन केले होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयासमोर वाल्मीक कराड यांच्याकडून जो दोष मुक्तीचा अर्ज करण्यात आला आहे.त्यावर आता या प्रकरणातील फिर्यादींनी आपले म्हणणे न्यायालयाला अर्जाद्वारे मांडले असल्याची माहिती मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलीय.
वाल्मीक कराड याने जे दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्याबाबत फिर्यादींनी आपले म्हणणे दाखल केले आहे. सीआयडी एसआयटी कडून जे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.त्यात खंडणी ते खून हे सगळे प्रकरण एकत्रित आहे. खंडणीतूनच हा खून झालेला आहे.या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे तेच फिर्यादीने आपल्या अर्जात म्हटले आहे.आणि हेच मत देशमुख आणि सगळ्या लोकांचे आहे.यांना फाशीची शिक्षा होणार आहे यातून कुणीच सुटणार नाही. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे देखील कटोरी कठोर शिक्षा व्हावी असेच म्हणणे आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके विरोधात सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
डॉबरमॅन कुत्र्याच्या गळ्यात सुपारीचे हार आणि लक्ष्मण हाके यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या विरोधात केलेल्या टिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
यापुढे लक्ष्मण हाके महाराष्ट्रमध्ये जिथे दिसतील तिथे त्यांच्यावर सुपारी फेकून निषेध केला जाईल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा इशारा
बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल 11 कोटी 68 लाखांचा अपहार...
नरडाणा एमआयडीसी भूखंडावर उद्योगाचे चित्र रंगवत कर्जातून 31 जणांनी लाटला निधी....
शिंदखेडा कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल....
टेक्स्टाईल्स हब योजनेंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा एमआयडीसीत मंजूर 12 हजार चौरस मीटर भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे चित्र 31 जणांनी रंगविले. त्यातून त्यांनी पुण्यातील इंडियन बँकेला हाताशी धरून तोच शासकीय भूखंड तारण दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करून घेतले, या प्रकरणी 2021 ते 2023 या कालावधीत बोगस उद्योजक, तत्कालीन एमआयडीसी अधिकारी, विधी अधिकारी, बँक अधिकारी आणि भूखंड माफिया, अशा एकूण 31 जणांनी संगनमतातून तब्बल 11 कोटी 68 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
पुणे : 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले.
सकाळी 7.45 वाजता मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात मिनी बस आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये अपघात
अपघातामध्ये मिनी बसमधील 29 शिक्षक आणि एक चालक जखमी
यामध्ये 16 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश
अपघातानंतर पलटी झालेला टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू
जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवले
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सध्या मागील चार तासांपासून पूर्णपणे ठप्प
गोव्यावरून येणारी वाहतूक पाली आणि उक्षी मार्गे वळवली तर मुंबईहुन गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवली
घटनास्थळी तज्ञांची टीम दाखल, पलटी झालेल्या टँकरमधून गॅस काढून वाहतूक केली जाणार पूर्ववत
मुंबई - गोवा महामार्ग सुरू होण्यासाठी आणखीन तास ते दीड तास लागू शकतो. सकाळी पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जवळच्या निवळी घाटामध्ये एलपीजी वाहतूक करणारा टँकर आणि मिनी बस यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये मिनी बसमधील प्रवासी जखमी झाले. जखमी असलेले सर्वजण हे शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीत चालले होते. सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे टप्पा असून संगमेश्वर आणि पाली मार्गे ती इतरत्र वळविण्यात आलेले आहे. दरम्यान सध्या मुंबई गोवा महामार्गावरती दोन्ही बाजूला अवजड वाहनांच्या रांगा आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सध्या आपल्या टीमसह घटनास्थळी आहेत.
बच्चू कडू आपल्या बेलोरा गावात
बैलबंडीत बसून बच्चू कडू आईच्या समाधीवर जाताय
आईच्या समाधी स्थळावर अभिवादन करून अमरावतीला होणार रवाना
आजपासून बच्चू कडूचं अन्नत्याग उपोषण...
अमरावतीत भव्य बाईक रॅली..
बाईक रॅली आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, त्याठिकाणी शिदोरी आंदोलन होईल
त्यांनतर अमरावती ते मोझरी भव्य बाईक रॅली..
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली जाईल..
जो पर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा..
करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे शेतीच्या कारणावरून एकाचा खून
अर्जुननगर येथील दोघा भावावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
शेताच्या बांधावरील झाडे काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती
झालेल्या भांडणात भुजंग सावळा रोकडे यांचा मृत्यू
तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ बाबुराव रोकडे यांच्या विरोधात करमाळा पोलिसात भारतीय न्याय संहितायाप्रकरणी ( बी.एन.एस) 2023 नुसार कलम 103 ( 1 ),115 (2 ),3(5),352 गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ बाबुराव रोकडे यांना अटक केल्याची माहिती करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली आहे
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 टक्क्याने भाजीपाल्यांचे आवक भेटण्याची प्रसिद्धी निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता पालेभाज्यांचा फळ भाज्यांचे दर मोठे प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने आबा कमी होऊ लागली असून मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात, पालक, यांच्यासह वांगी, टोमॅटो,भोपळा,मिरची, काकडी यांच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून ग्राहकांना मात्र पालेभाज्या खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.
सोलापूर शहराची शांतता भंग करणाऱ्या एका महिलेसह 4 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केलंय. सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी या चौघाच्या तडीपारीचा आदेश देण्यात आलाय. दीपक जाधव, सचिन कलप्पा व्हनमाने, कपिल भांडेकर आणि फरजाना अब्बास शेख अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दीपक जाधव यांच्याविरुध्द दंगा व मारामारी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सचिन व्हनमाने यांच्याविरुध्द घरफोडी, दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपी कपिल भांडेकर यांच्याविरुध्द नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. तर फरजाना शेख या महिलेविरुद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र घोरणे, पाकिट चोरणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक .
फरार असलेल्या अविनाश धोडी याला दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक केल्याची माहिती .
पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडी याला अटक .
मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला जेरबंद करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश .
बीडच्या आष्टी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत सोयाबीनचे बियाणे वाटप केले जात आहे.. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यासाठी ऑनलाईन नोंद केली होती.. त्यातील साडेसातशे शेतकऱ्यांची निवड झाली असून या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणं वाटप केले जातंय.. दरम्यान अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वाटप केले जाणाऱ्या बियाण्यांचे लक्ष आद्याप पूर्ण झाले नसून या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर याची नोंद करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याने सपोर्टसाठी चक्क लोखंडी बार लावण्यात आले आहेत तसेच चोपदार दरवाज्यात देखील सपोर्ट साठी लोखंडी फ्रेम लावली आहे.त्यामूळे देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.अवकाळी पावसाने मंदीरात अनेक ठिकाणी गळती लागली आहे.माञ गाभारा मध्ये कुठेही गळती लागलेली नसल्याचे सांगत पुरातत्व विभागाच्या वतीने स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर गाभाऱ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी बार व फ्रेम लावुन उपाययोजना केल्याची माहिती मंदीर संस्थानचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलीय.
नाशिक: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिकमध्ये देखील आता एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. नाशिक आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे जिल्हा रुग्णालयामध्ये 15 बेडचा कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.चारुदत्त शिंदे यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कोरोना कक्ष सुरू केल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करणार महा ऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
तळेगाव येथे पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल चे करणार उद्घाटन
शिरूर येथे जॉन डियर ग्रुप कंपनीच्या कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थितीत
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर ...
- वेगवेगळ्या लग्न समारंभाला राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित...
- शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या पुतणीच्या लग्नाला देखील एकनाथ शिंदे राहणार उपस्थित...
- इतरही काही लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर...
जालना तालुक्यात काल सायंकाळी आणि आज सकाळी आलेल्या वादळी पावसामुळे जोरदार तडाखा दिला, या.घटनेत जालना तालुक्यातील सेवली तांडा, धारकल्याण या भागामध्ये काही घरावरील पत्रे आणि छप्पर उडाले असून यात एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहेत जखमीवर जालना येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली,
शिवली येथे या वादळी पावसाचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामुळे या वादळाची तीव्रता किती भयंकर होती, हे कळतंय.
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार
या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र
ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्र
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार
राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका व साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात
मे महिन्याच्या अंती झालेल्या पावसामुळे धरण पाणी साठ्यात पाणी पातळी वाढायला मदत
चार धरणे मिळून १८.७० टक्के पाणीसाठी
गेल्या वर्षी आजच्या तारखेला १४.५७ टक्के पाणीसाठा
गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी ४ टक्के जास्त पाणीसाठा
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
खडकवासला: 41.01 टक्के
पानशेत: 15.67 टक्के
टेमघर: 4.80 टक्के
वरसगाव: 21.80 टक्के
चार धरणातील एकूण पाणीसाठा: 18.70 टक्के
गेल्या वर्षी चार धरणातील एकूण पाणीसाठा: 14.57 टक्के
नागपूर शहरात इंटेलिजन ट्राफिक सिस्टीम अंतर्गत प्रत्येक चौकात अत्याधुनिक ट्राफिक सिग्नल लावण्यात येत आहे. या ट्राफिक सिंग्नल वर चालत्या वाहनांची नंबर प्लेट स्कॅनर करण्याची व्यवस्था तर आहे . पण महत्वाचे म्हणजे रेड लाईट व ग्रीन लाईन वेगळ्या पद्धतीने वाचकांसाठी दर्शवण्यात आला आहे. रेड लाईट असतांना 'थांबा' हा व ग्रीन लाईट असेल 'जा' ब्लिंकिंग करून सिंग्नल दिला जात आहे. या माध्यमातून ट्राफिक सिंग्नल वर उभे असतांना वाहकांच्या अलर्टनेस वाढावा व सिंग्नल डम्पिंगचे प्रकार थांबावे हा या पाठीमागचा उद्देश आहे. सध्या नागपूर महानगर पालिकेकडून हे ट्राफिक सिंग्नल बदलीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने
मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे दरम्यान सकाळी ८ ते १.३० पर्यंत मेगाब्लॉक, जलद मार्गावर लोकल वळवणार; १५ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते ४.०५ दरम्यान ब्लॉक, सीएसएमटी-पनवेल, ठाणे-पनवेल लोकल रद्द
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३५ ब्लॉक, काही लोकल दादर/वांद्रेपर्यंतच मर्यादित
प्रवाशांनी प्रवासाच्या आधी वेळा तपासूनच स्टेशनवर गर्दी टाळावी, रेल्वे प्रशासनाकडून विशेष फेर्या सुरू.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातून सात दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चोरलेल्या दुचाकी विक्री करत असताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले आहे. शेख इलियास शेख गफार असे दुचाकी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे. चोरलेल्या दुचाकीची बाजार भाव किंमत सहा लाखांच्या जवळपास आहे. बीडच्या तळेगाव येथे दुचाकी विक्री करताना आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली.
नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी उशिरा जोरदार पावसाने हजेरी लावली..या पावसामुळे येवला तालुक्यातील नगरसुल येथे घराचे छत कोसळून एक लहान मुलगी जखमी झाली आहे..तसेच अंदरसुल येथे गाईंच्या गोठ्याला असलेले छत कोसळून त्यात पाळीव गाई जखमी झाल्या आहेत.. तर गवंडगाव शिवारात झाडे कोसळून वाहनांचेही नुकसान झाले.
राहुल गांधींना लेखानेच प्रत्युत्तर देणार...मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट.... विधानसभा निवडणूक चोरल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीस काय पलटवार करणार याकडे लक्ष
मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई निरीक्षकांची नेमणूक, सेना-मनसे युतीसंदर्भातही चर्चेची शक्यता
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिवकवर