= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MVA, MNS Press Conferance: सत्याचा मोर्चासाठी विरोधी राजकीय पक्षांची आज संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन MVA, MNS Press Conferance: सत्याचा मोर्चासाठी विरोधी राजकीय पक्षांची आज संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन
महाराष्ट्रातील मतदार यादी घोळाबाबत महाराष्ट्र आणि मुंबई कॉंग्रेस चं नेतृत्व अलिप्त राहण्याचा प्रयत्न?- राजकीय वर्तृळात चर्चा
सलग दुस-यांदा मतचोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील कॉग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व बैठक आणि पत्रकार परिषदेत अनुपस्थित असणार, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईबाहेर तर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड दिल्लीत आहेत. काँग्रेसकडून आज प्रवक्ता सचिन सावंत आणि माजी आमदार नसीम खान संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेत सहभागी होणार आहे.
मतदार यादी घोळबाबत ठाकरे बंधुंची एकत्रीत होणारी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. यापूर्वी वाय बी चव्हाण सेंटमध्येच पहिली पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी, कॉग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शशीकांत शिंदे उपस्थित होते. आजच्या संयुक्त बैठकीत व पत्रकार परिषदेत राज- उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, सचिन सावंत उपस्थित असतील...
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Solapur Crime : धक्कादायक! ओढ्याच्या प्रवाहात शाळकरी मुलगा वाहून गेला Solapur Crime : ओढ्याच्या प्रवाहात शाळकरी मुलगा वाहून गेला असून अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (बु) येथील धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार असं वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचं नाव आहे. प्रशांत हा आपल्या मामाला डबा देऊन घरी परत येत होता. मात्र गावाजवळ असणाऱ्या ओढा ओलांडताना पाय घसरून पडल्यामुळे हा बारा वर्षीय शाळकरी मुलगा गेला वाहून. प्रशांतला शोधण्यासाठी तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे. आंदेवाडी बु येथे गावाला जोडणारा मोठा पूल नसल्यामुळे ओढ्यातून ग्रामस्थ विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Phalatn Doctor Death News: फलटणच्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मार्डचं काळ्याफिती बांधून आंदोलन Phalatn Doctor Death News: फलटण येथील डॉ. संपदा मुंडे खून प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये मार्ड डॉक्टर आक्रमक झाले आहेत. प्रतिनिधिक स्वरूपात या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्याफिती लावून काम करण्यात येत आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचा प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला नोकरी व पाच कोटी रुपये द्या त्याचबरोबर डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायदा तयार करा या मागण्या यावेळी मार्डच्या वतीने करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Unseasonal Rain: कोकणात पडलेल्या अचानक पावसाचा शेतकऱ्यांना फटका; भातपीक मुंबई-गोवा महामार्गावर सुकवण्याची वेळ Maharashtra Unseasonal Rain: अचानक झालेला हवामान बदलाचा फटका कोकणातील भात शेतीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. भात कापण्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केले मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कापलेले पिक पावसात भिजून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
पेरणीपूर्व पाऊस सुरू झाल्यामुळे आधीच कोकणात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते त्यातूनही ज्या शेतकऱ्यांनी शेती केली त्यांचे पीक हातातोंडाशी आले असताना अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे महामार्गाच्या लगत असलेल्या शेतीमधील भात पीक शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या सर्विस रोडवर सुकण्यासाठी ठेवल्याचे चित्र पाहायला मिळते मात्र तरी देखील येणाऱ्या पावसामुळे सुकट ठेवलेले पीक देखील खराब होत असल्याचे शेतकऱ्यांची व्यथा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed Crime: विवाह ठरलेल्या घरावर सशस्त्र दरोडा, गळ्याला धारदार शस्त्र लावून अकरा लाखांचा ऐवज लुटला Beed Crime: बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात सशस्त्र दरोडा पडला. यादरम्यान चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 11 लाखांचा ऐवज लंपास केला. बबन मांजरे यांच्या मुलाचे लग्न होते. यासाठी ते नाशिकला कुटुंबासह वधू मुलीकडे जाणार होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने घरावर सशस्त्र दरोडा टाकला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Solapur Crime : मुंबईतून एमडी ड्रग्स आणून सोलापुरात विकणाऱ्य तस्कराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या Solapur Crime : मुंबईतून एमडी ड्रग्स आणून सोलापुरात विकणाऱ्य तस्कराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून केली आरोपीला अटक, एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलेत. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे. आरोपी मूळचा पुण्याचा असून तो मुंबईतून अमली पदार्थ घेऊन सोलापुरात विकत होता. अंमली पदार्थ विक्रीसाठी तो सोलापूर बस स्थानकावर उतरल्यानंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मोहम्मद कुरेशी याच्या विरोधात एनडीपीएस एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाकडून त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed Crime : बीडमध्ये गुंडांचा पुन्हा हैदोस, हॉटेल कामगाराला अमानुष मारहाण; जखमी कामगारावर उपचार सुरू Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बीड शहरातील एका हॉटेलवर पाच जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून धुडगूस घालत हॉटेल कामगाराला लोखंडी रॉड आणि दांडक्याने अमानुष मारहाण केली. या घटनेत हॉटेल कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी कामगारावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण पवार, दिलीप पवार आणि अभिषेक खाडे या तिघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. यातील सर्वच आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. याआधी देखील आरोपींनी अनेक ठिकाणी असाच हैदोस घातला होता. या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Phaltan Doctor Death News: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण; पीएसआय गोपाल मदने आणि प्रशांत बनकर याला न्यायालयात हजर करण्यात येणार Phaltan Doctor Death News: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी पीएसआय गोपाल मदने आणि प्रशांत बनकर याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांना देखील 30 तारखेपर्यंत आज अखेर पोलीस कोठडी सोनवण्यात आली होती. मृत महिलेसोबत आत्महत्या आधी प्रशांत बनकर याचे काय बोलणे झाले याच्या तपासा करता प्रशांत बनकर याची पोलीस कोठडी मध्ये वाढ करण्यात आली होती. आज प्रशांत बनकर ला न्यायालयत हजर करण्यात येणार आहे. कोर्ट काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे पीएसआय गोपाल बदने याच्या पोलीस कस्टडीत वाढ होणार का हे देखील पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी दरबारी लगबग Maharashtra News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी दरबारी लगबग सुरू झालीय. राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) खरेदी, देखभाल व इतर आवश्यक खर्चासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. जवळपास 200 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीपैकी 50 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खरेदीसाठी आणि उर्वरित 50 कोटी रुपये सहाय्यक अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai News: मुलुंडची जागा धारावीकरांसाठीच, पुनर्वसनासाठी मुलुंडमधील 58.5 एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय Mumbai News: मुलुंडची जागा धारावीकरांसाठीच राहणार असून धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधील 58.5 एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पास देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या 58.5 एकर जागेपैकी 42.51 एकरांवरील मिठागराच्या विकासासाठी डीआरपीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. अशातच, धारावी पुनर्विकासातंर्गत पहिल्यांदाच अपात्र रहिवाशांचंही पुर्नवसन होणार आहे.
मुलुंड, कुर्ला, कांजूरमार्ग आणि अन्य ठिकाणी भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजनेत सामावून घेणार आहे. दरम्यान, मुलुंडमधील काही रहिवाश्यांकडून धारावीसाठी जागा देण्यास विरोध झाला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात याचिका न्यायालयाने फेटाळत राज्य सरकार आणि डीआरपीला दिलासा दिला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Farmers Protest: नागपुरात सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाचे स्थान बदलले, पण आंदोलन सुरूच Nagpur Farmers Protest: नागपुरात सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाचे स्थान बदलले आहे, मात्र आंदोलन सुरू आहे. मौजा परसोडी येथे केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानावर आंदोलक आंदोलनावर ठाम आहे.. आज बच्चू कडू मुंबईला जातील आणि सरकार सोबत चर्चा करतील. त्यातून काही सकारात्मक निर्णय लागले तर आंदोलन संपेल अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केला जाईल आणि नागपूरसह गावोगावी आंदोलन पसरेल असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune News: जैन बोर्डिंगच्या जामीन व्यवहारावर आज महत्त्वाची सुनावणी, सुनावणीकडे सर्वांच लक्ष Pune News: जैन बोर्डिंगच्या जामीन व्यवहारावर आज महत्त्वाची सुनावणी होणार, सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातील वादावर आज धर्मादायुक्तांकडे सुनावणी पार पडणार आहे. ट्रस्टच्या नावावर जागा झाली नाही तर, एक तारखेपासून गुप्तिनंदी महाराजांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या सुनावणीत गेल्या वेळेस ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत. आज दोन्हीकडून प्रतिज्ञापत्र देऊन व्यवहार रद्द करण्याचा मान्य केलं तर निकाल येऊ शकतो? देशभरातील जैन बांधवांचे तसेच आंदोलकांचे या सुनावणी कडे लक्ष असणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Wether Updates : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी 913 कोटी रुपये मंजूर Maharashtra Wether Updates : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी 913 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur News: पोलिसांनी खासदारांना धक्का दिल्यानं खासदारांनी पोलीस कमिश्नर यांना फटकारले Nagpur News: पोलिसांनी खासदारांना धक्का दिल्यानं खासदारांनी पोलीस कमिशनर यांना फटकारले. बच्चू कडू यांच्या आंदोलना दरम्यान परत जात असतांना खासदार अमर काळे यांनी पोलीस सीपी यांना चांगलेच फटकारले. सरकारचे शिष्टमंडळात असलेले मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून गेल्यावर पोलीस कमिशनर यांच्यासाठी रस्ता मोकळा करत असतांना पोलिसांनी नागरिकांसह खासदार यांना धक्का दिलाय. धक्का देताच खासदार अमर काळे हे चांगलेच संतापले. पोलिसांकडून सीपीसाठी धक्का बुकी केली जात होती, सीपी काय देव आहे काय.... त्यांना जायचं होत तर बाजूने जायचं होतं. पोलिसांना हेच सांगितलंय की, सीपी हे स्वार्गातून तर आले नाहीय त्यांनी व्यवहार बरोबर करायला हवं हेच सांगितलंय अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Voters List: मतदार यादीतील घोळावर मनसेचा स्फोट; चारकोपमध्ये उघड मोठं प्रकरण Voters List: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम सुरू, चारकोप विधानसभा मतदारसंघात मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षण. तपासणीदरम्यान उत्तम विजय बारस्कर नावाच्या व्यक्तीचं नाव एकाच यादीत दोनदा असल्याचं आढळलं. दोन्ही नोंदींमध्ये फोटो मात्र वेगळे - एक बरोबर, दुसरा अनोळखी व्यक्तीचा! मनसेचा आरोप - बोगस मतदार घुसवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय. आणखी एक धक्कादायक बाब —यमुनाबाई गणपत कांबळे नावाच्या महिलेच्या नोंदीवर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेचा फोटो. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह.
दिनेश साळवी यांची मागणी - राज्य निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी. मनसेचा इशारा - "हा प्रकार थांबवला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन उभं करू." मतदार यादी ही लोकशाहीची मुळं, त्यातील घोळ म्हणजे लोकशाहीवर थेट प्रहार असल्याचा मनसेचा आरोप. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून सर्व मतदारसंघांतील याद्यांची सखोल छाननी होणार. नागरिकांनी स्वतःची नोंद तपासून बोगस नोंदींचा पर्दाफाश करण्यात सहभागी व्हावं, असं आवाहन मनसेकडून. करण्यात आले आहे.