(Source: Poll of Polls)
Maharashtra Breaking Live Updates: देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Updates 30th October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking Live Updates 30th October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि मनसेचा सदोष मतदार यादी विरुद्धचा सत्याचा मोर्चा 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चापर्वीच राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.
Bacchu Kadu : आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांकडून नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही चार वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवं होतं, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असं बच्चू कडू म्हणाले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असं पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं. सरकारनं कर्जमुक्तीची तारीख सांगावी यासाठी लढा असल्याचं म्हटलं.
MVA, MNS Press Conferance: सत्याचा मोर्चासाठी विरोधी राजकीय पक्षांची आज संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन
MVA, MNS Press Conferance: सत्याचा मोर्चासाठी विरोधी राजकीय पक्षांची आज संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेचं आयोजन
महाराष्ट्रातील मतदार यादी घोळाबाबत महाराष्ट्र आणि मुंबई कॉंग्रेस चं नेतृत्व अलिप्त राहण्याचा प्रयत्न?- राजकीय वर्तृळात चर्चा
सलग दुस-यांदा मतचोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील कॉग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व बैठक आणि पत्रकार परिषदेत अनुपस्थित असणार, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईबाहेर तर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड दिल्लीत आहेत. काँग्रेसकडून आज प्रवक्ता सचिन सावंत आणि माजी आमदार नसीम खान संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषदेत सहभागी होणार आहे.
मतदार यादी घोळबाबत ठाकरे बंधुंची एकत्रीत होणारी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. यापूर्वी वाय बी चव्हाण सेंटमध्येच पहिली पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी, कॉग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शशीकांत शिंदे उपस्थित होते. आजच्या संयुक्त बैठकीत व पत्रकार परिषदेत राज- उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, सचिन सावंत उपस्थित असतील...
Solapur Crime : धक्कादायक! ओढ्याच्या प्रवाहात शाळकरी मुलगा वाहून गेला
Solapur Crime : ओढ्याच्या प्रवाहात शाळकरी मुलगा वाहून गेला असून अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (बु) येथील धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार असं वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचं नाव आहे. प्रशांत हा आपल्या मामाला डबा देऊन घरी परत येत होता. मात्र गावाजवळ असणाऱ्या ओढा ओलांडताना पाय घसरून पडल्यामुळे हा बारा वर्षीय शाळकरी मुलगा गेला वाहून. प्रशांतला शोधण्यासाठी तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे. आंदेवाडी बु येथे गावाला जोडणारा मोठा पूल नसल्यामुळे ओढ्यातून ग्रामस्थ विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास.



















