Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 03 Jun 2025 03:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे.. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे. मागील...More

आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 90 जणांची फसवणूक; दीड कोटी रुपयांचा अपहार

-आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने नव्वद जणांची फसवणूक तर,दीड कोटी रुपयांचा अपहार...


- आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी 90 जणांची फसवणूक...


- माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय...


- आरोग्य विभागात विविध पदांवर पद भरतीच्या नावाने दीड कोटी रुपये उकळले...


- नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक...


- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांविरोधात गुन्हा दाखल...


धुळे, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती लावून देण्याचा अमित दाखवून तब्बल 90 उमेदवारांची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुणाल भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नाशिकच्या सरकार वडा पोलीस ठाण्यात कविता भदाने आणि वैभव पोळ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा देखील वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यासंदर्भात सरकारवाडा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.