Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Advertisement

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 24 Jun 2026 01:59 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...Tukaram Mundhe : गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटकराज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी...More

भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद; बागायती पीक करपली; भंडाऱ्यात शेतकरी आक्रमक

राज्यात एकीकडं मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली असताना भंडाऱ्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली नाही....राज्य सरकार एकीकडं शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याच्या मोठ्या-मोठ्या घोषणा करतंय. पण, दुसरीकडं महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक डोळ्यांदेखत अक्षरशः करपून गेलंय. भंडारा तालुक्यातून साहुली आणि जुनी पिंपरी गावात महिनाभरापूर्वी आलेल्या वादळात तुटलेल्या वीज तारा आणि पडलेले खांब महावितरणला अजूनही उभे करता आलेलं नाही. परिणामी, कडक उन्हात पाणी नं मिळाल्यानं लाखो रुपयांचा भाजीपाला झाडालाचं करपून काळेकुट्ट झालाय. महावितरणच्या या मनमानी कारभाराला कंटाळून, "४ दिवसांत वीज दिली नाही तर, आत्महत्या करेन", असा उद्विग्न इशारा साहुली येथील एका शेतकऱ्यानं दिला आहे. सरकार कागदावर मोफत विजेच्या घोषणा करत असताना, जमिनीवर मात्र महावितरणच्या सुस्त कारभारामुळं बळीराजाचा जीव टांगणीला लागलाय. आता या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याचा इशारा ऐकल्यानंतर तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? की एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाण्याची वाट हे अधिकारी पाहत आहेत? असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. 

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.