Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना

Maharashtra Breaking Live Updates: अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देण्यात आला आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 23 Jun 2025 06:05 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking Live Updates: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. तर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरूच आहे. अमेरिकेला...More

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, पण बुलेट ट्रेनसाठी आहेत; शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

कराड : राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे. राज्याची परिस्थिती योग्य नाही, शेतकऱ्यांना जेव्हा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळेस राज्याची परिस्थिती योग्य होती म्हणून दिले होते का? आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास कसला करता राज्याची परिस्थिती चांगली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच  शहरांमध्ये मेट्रो बुलेट ट्रेन बांधायला सरकारकडे पैसा आहे. परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी फक्त 25 ते 30 हजार कोटी लागणार आहेत. त्यासाठी सरकार तयार नाही जर आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.