Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना
Maharashtra Breaking Live Updates: अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देण्यात आला आहे.
LIVE

Background
Maharashtra Breaking Live Updates: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. तर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरूच आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देण्यात आला. यानंतर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, असं आव्हान अमेरिकेकडून देण्यात आले आहे. यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर महाराष्ट्रात पंढरपुर वारीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या घडामोडींसह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, पण बुलेट ट्रेनसाठी आहेत; शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल
कराड : राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे. राज्याची परिस्थिती योग्य नाही, शेतकऱ्यांना जेव्हा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळेस राज्याची परिस्थिती योग्य होती म्हणून दिले होते का? आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास कसला करता राज्याची परिस्थिती चांगली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच शहरांमध्ये मेट्रो बुलेट ट्रेन बांधायला सरकारकडे पैसा आहे. परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी फक्त 25 ते 30 हजार कोटी लागणार आहेत. त्यासाठी सरकार तयार नाही जर आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
तस्करीसाठी वाघाची कातडी व हस्तिदंत बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक
सोलापूर : तस्करी करण्यासाठी वाघाची कातडी आणि हस्तिदंतजवळ बाळगणाऱ्या टेंभुर्णीतील एका व्यापाऱ्यास सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. टेंभुर्णीतील कलर व्यापारी अमोल विजयकुमार शहा यांच्याकडून वाघाची कातडी व हस्तिदंत जप्त करीत पोलिसांनी त्यास अटक केली आहे. या कारवाईने माढा परिसरात खळबळ उडाली असून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या तपासातून उघड होण्याची शक्यता आहे.


















