Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Advertisement

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 Jul 2026 09:37 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?Shraddha...More

पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय?

पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालीय का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण काल कोथरुड मधे ज्या अमित शिंदे वर कोयत्याने वार करण्यात आला तो निलेश घायवळच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने अमित शिंदे यांच्या कोथरुड मधील मोबाईल दुकानातून सीम कार्ड घेतले होते. पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अमित शिंदेवर काल कोयत्याने हल्ला करण्यात आला. हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलीसांच म्हणणं आहे. मात्र या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे. निलेश घायवळ हा सप्टेंबर महिन्यात परदेशात पळून गेला असून परदेशातुन तो टोळी चालवतो आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.