पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची (HSC Exam Result 2026) प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल आज शनिवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत 12 वीचा निकालाबाबत माहिती देत आहेत. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहेत. यावर्षी देखील निकाल घटला आहे, यावरती बोलताना कुलकर्णी म्हणाले, निकाल घटण्यामागे कारण मुख्यत्वेकरून मी मागचा निकाल कंपेर करतो त्यामागे कॉपीमुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबवलं गेलं असं मला वाटतं. गेल्या वर्षी एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई झाली नव्हती, यावेळी 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 91.88 निकाल होता यावर्षी 2.0 टक्क्याने निकाल कमी झाला आहे.

त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं की, फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 153 विषयांचे परीक्षा घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळातून राज्यात एकूण 14 लाख 58 हजार एवढ्या मुलांनी परीक्षा दिली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 89.79 टक्के इतका लागला आहे. बारावीचा गेल्या वर्षीचा निकाल पाहिला असता  91.88 टक्के लागला होता. दरवर्षी प्रमाणं मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती. मुलींच्या निकालाची टक्केवारी  94.54 टक्के इतकी होती. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.51 टक्के इतकी होती. तर कॉपी घडू नये यासाठी अनेक जण लक्ष ठेवून होते, परिक्षा अतिशय चांगल्या पध्दतीने घेण्यात आली एकूण 15 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या परिक्षेदरम्यान 100 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. 

यंदाही 12 वीच्या निकालाटी टक्केवारी घटली असली तरी, 12 वीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra HSC Result 2026:  नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा निकाल जाहीर

पुणे 91.25

नागपूर 88.67

छत्रपती संभाजीनगर 8868

कोल्हापूर 89.97

अमरावती 90.92

नाशिक 90.72

लातूर 84.14

कोकण 94.14

मुंबई 90.08

दुपारी एक वाजल्यानंतर ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.  राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. 

Maharashtra 12th Result 2026: खालील वेबसाईटवर निकाल पाहता येणार

राज्य मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार

1.https://results.digilocker.gov.in

2.https://mahahsscboard.in

3.https://hscresult.mkcl.org

4.https://results.targetpublications.org

5.https://results.navneet.com

6 .https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results.

वरती देण्यात आलेल्या वेबसाईटवरती 12 वीचा निकाल पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in ( in college login ) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ट्रॅफिक जॅम होईल म्हणून जास्त वेबसाईट देण्यात आल्या आहेत.

Maharashtra HSC 12th Result 2026: बारावी निकालाचा टक्का का घसरला?

* कॉपीमुक्त अभियान काटेकोर राबवलं* सीसीटीव्हीमुळे कॉपीमुक्त परीक्षा* बोर्डाचे सर्व अधिकारी, शिक्षकांकडून काटेकोर नियोजन* परीक्षा पूर्व आणि परीक्षा काळातील संवाद

HSC Result 2026: वर्षानुवर्षे घटतोय 12 वी चा निकाल

  • 2022 - 94.22% 
  • 2023 - 93.73% 0.49%
  • 2024 - 93.37% 0.66%
  • 2025 - 91.88% 1.49%
  • 2026 - 89.79% 2.09%

राज्यात उत्तीर्ण होण्यात मुलींनी परत बाजी मारली

मुलीची 93.15 टक्के उत्तीर्ण

मुले 86.80 टक्के उत्तीर्ण

सलग दुसऱ्या वर्षी निकालाचा टक्का घसरला

फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता 

फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के

या वेबसाईटवर दिसणार निकाल

दुपारी 1 वाजता खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल.

https://hscresult.mkcl.org/

https://hscresult.mahahsscboard.in/

https://mahresult.nic.in/

निकालासाठी काय लागेल?

1. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)

2. आईचे नाव (Mother's First Name)

निकाल कसा पाहायचा?

mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

'HSC Examination Result 2025' लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.

तुमच्या आईचे पहिले नाव टाका.

'View Result' वर क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

Maharashtra HSC 12th Result 2026: SMS वर निकाल पाहण्यासाठी काय करावे?

निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर येतात, ज्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची किंवा वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थी SMS द्वारे आपला निकाल त्वरित मिळवू शकतात.

12th Result 2026: काय मेसेज टाईप कराल?

12वीचा निकाल एसएमएसद्वारे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMS च्या माध्यमातून दिसणार आहे.