नांदेड : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मराठा आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहे. याशिवाय आंदोलनामुळे रेल्वे वाहतूकही उशिरानं सुरू आहे.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आंदोलकांनी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस चौदावा-पूर्णा दरम्यान तीन तास थांबवली होती. तसेच नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दोन तासांपासून थांबून आहेत. तर अमरावती-तिरुपती एक्सप्रेस चुडावा-नांदेड दरम्यान एक तास थांबविण्यात आली.


या सर्व प्रकारामुळे रेल्वेला मोठ्या तोटा सहन करावा लागत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी रेल्वेने आपल्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. तसेच आंदोलकांना संयम बाळगण्याचं आणि रेल्वेचं नुकसान न करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रद्द केलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.


रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1. गाडी क्रमांक 57540 परळी-अकोला सवारी गाडी रद्द
2.  गाडी क्रमांक 57583 अकोला-पूर्णा सवारी गाडी रद्द
3. गाडी क्रमांक 57512 परभणी-नांदेड सवारी गाडी रद्द


अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1. गाडी क्रमांक 57554 आदिलाबाद-परळी सवारी गाडी पूर्णा-परळी  दरम्यान रद्द
2. गाडी क्रमांक 57541 नगरसोल-नांदेड सवारी गाडी परभणी -नांदेड दरम्यान रद्द
3. गाडी क्रमांक 57562 मनमाड-काचीगुडा सवारी गाडी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक 57561 बनून परभणी-मनमाड अशी धावेल.
4. गाडी क्रमांक 57561 काचीगुडा-मनमाड सवारी गाडी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक 57562 बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल.


संबधित बातम्या


महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड


मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!


महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या


महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय?


महाराष्ट्र बंद : शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या


महाराष्ट्र बंद : कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद?