शासनाच्या बालनाट्य स्पर्धेमध्ये 'खासगी हस्तक्षेप'? उदय सामंत यांच्या पत्नीच्या संस्थेकडे बोट
Balrangbhoomi Parishad : शासनाकडून आयोजित करण्यात येणारी बालनाट्य स्पर्धा यंदा खासगी संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेकडून आयोजित करण्यात येणार आहेत. नीलम शिर्के सामंत त्याच्या अध्यक्षा आहेत.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दरवर्षी आयोजित केली जाणारी बालनाट्य स्पर्धा (Children's Theatre Competition) आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा (Divyang Children’s Drama Competition) यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. बालरंगभूमी परिषद (Balrangbhoomi Parishad) या खासगी संस्थेकडून शासनाच्या स्पर्धा 'हायजॅक' केल्या जात आहेत आणि हे सर्व राजकीय दबावाखाली (Political Pressure) होत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तसे गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेकडून सरकारच्या सांस्कृतिक कार्यसंचालनावर दबाव आणण्यात आला. त्या माध्यमातून बालरंगभूमी परिषद या खाजगी संस्थेकडून बालनाट्य ही शासकीय स्पर्धा हायजॅक केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Uday Samant Wife Neelam Shirke : मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी अध्यक्षा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत (Neelam Shirke) या बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या संस्थेवरच हे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
Children's Theatre Competition : स्पर्धा शासनाच्याच नियंत्रणाखाली असावी
या स्पर्धा मागील 21 वर्षांपासून सरकारच्या सांस्कृतिक कार्यसंचलन विभागाकडून आयोजित करण्यात येत आहेत. राज्यभर त्या यशस्वीपणे पार पडत आहेत. परंतु यंदा शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा न करता बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून स्पर्धा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्पर्धांचे खासगीकरण असून, यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो, असा आरोप केला जात आहे.
Balrangbhoomi Parishad : नाट्य संस्थांचा विरोध, पारंपरिकतेवर गदा
राज्यभरातील अनेक पारंपरिक आणि नामवंत नाट्य संस्था या निर्णयास विरोध करत आहेत. अशा प्रकारच्या निर्णयामुळे स्पर्धेचा दर्जा, परीक्षकांची निवड, तसेच पारंपरिक नाट्यप्रेमींचे योगदान धोक्यात येईल, असा इशाराही देण्यात येत आहे.
मागणी काय आहे?
बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने स्पष्ट मागणी केली आहे की, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा शासनाने स्वतःच आयोजित कराव्यात. खासगी संस्थांना स्पर्धांचे हक्क देणे चुकीचे आहे. तसेच, शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचेच संपूर्ण नियंत्रण राहावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:



















