Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आज अधिवेशनातही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शिवसेनेच्या महिला आमदारांनी आज विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. महिलेने स्वतःला किती वेळा सिद्ध करायचं असा प्रश्न विचारत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आणि मनिषा चौधरी यांनी  यांनी या प्रकरणात कारवाईची करत मास्टरमाईंडला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच आमदार भारती लव्हेकर यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीची मागणी केली आहे.


भाजप आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या की, सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल केली जात आहे. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना संधी दिली. पहिला व्हिडीओ कोणी मॉर्फ केला हे शोधून काढावं तसेच या मागचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. तर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव म्हणाल्या की, एका महिलेची मॉर्फ केलेली क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. यावर कधी कारवाई करणार? त्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहायला पाहिजे. सर्वांचे मोबाईल जप्त करा. ज्या कंपन्या हे व्हायरल करतात त्यांच्यावर कारवाई करा, असे भारती लवेकर म्हणाल्या.


सखोल चौकशीची अजित पवारांची मागणी


तर विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले की, महिला आमदारांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजकीय मत वेगळी असू शकतात. लोकप्रतिनिधींनी एखादी गोष्ट केली नसेल तर असे व्हायरल होत असेल तर योग्य नाही याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. एसआयटी स्थापन करुन कालबद्ध चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.  


काय आहे प्रकरण?


गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.