Naresh Mhaske on Sanjay Raut : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला गेले होते. त्यांची रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा झाली आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhask) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीच्या फेऱ्या मारणे अशी टीका चुकीची आहे. संजय राऊतांना एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं असा टोला म्हस्के यांनी लगावला.
काल रात्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे. मंत्रिपद मागितल्याचा चर्चा सकाळपासून सुरू आहेत. तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्र्राचं सुख, समृध्दी आणि भरभराटी मागितली आहे. फक्त राज्याचा विकास आणि समृद्धीबाबत चर्चा झाल्याची माहिती नरेश म्हसके यांनी दिली. राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागत असते. हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे तळवे चाटत असतात, असी टीका देखील नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली. राऊत वाटेल ते बरळत असतात असेही म्हस्के म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
प्रचंड बहुमत असताना सुद्धा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आठ-आठ दिवस लागत आहेत. मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही स्वागत करू. आम्हाला निकाल मान्य नसला तरी आकडे महत्वाचे असतात. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. गांधीवादी नेते बाबा आढाव यांना वयाच्या 95 व्या वर्षी आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? पोलीस महासंचालक कोण असेल? मुंबई आयुक्त कोण असाव? हे दिल्लीतून मोदी आणि शाह ठरवत आहेत आणि महाराष्ट्राचे नेतृत्व मान झुकवून उभे आहे. अशी टीका राऊतांनी केली होती.
महायुतीत ते तीन पक्ष एकत्र आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पदाचे वाटप कसे करावे हा त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले तर त्यांच्याकडे काही पर्याय नसेल. त्यांना जे हवे आहे ते मागतील पण मिळालं नाही तरी ते सरकारमध्ये पडून राहतील. भाजपला जे काम करून घ्यायचं होतं ते झालेलं आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. या त्यांच्या टीकेला म्हस्के यांनी प्रतित्युर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या: