मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांमधला संघर्ष सध्या निवडणूक आयोगातही सुरू आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) महत्त्वाचं भाष्य केलं आहे. निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला तरी मान्य असेल असं अजितदादा पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार तेव्हा बारामतीत होते. त्याबद्दल अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. अमित शाहांच्या कार्यालयाला मी कळवलं होतं, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. 


अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे देशाचे प्रमुख होऊन 14 महिने झाले. प्रत्येक यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडण्याचं काम करत असते, या बातम्यामध्ये काही तथ्य नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे . मी काय सांगितलं या बातम्या काही सत्य नाही जोपर्यंत कुठला निकाल येत नाही तोपर्यंत हे असं झालं तर तसं झालं तर काय होईल हे असले मी विचार पण करत नाही. मी  फक्त विकासाचा विचार करतो. इलेक्शन कमिशन (Election Commission) अंतिम निर्णय देते,  इलेक्शन कमिशनसमोर दोन्ही गट आपली बाजू मांडतील. बाजू मांडल्यानंतर जो अंतिम निर्णय येईल तो मी तरी मान्य करणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो


 आरक्षणावरुन वाद सुरु असतानाच आता  मुस्लिम आरक्षणवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम आरक्षणासाठी  बैठक घेतली यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले,  अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी मुस्लिम समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. सगळ्यांची एक बैठक घेतली होती. काम करत असताना सगळ्यांचा विचार करत असतो. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करत असतो आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हे त्या रस्त्याने पुढे जात असतो.


मी लोकसभेचा विचार केलेला नाही : अजित पवार


 राज्यातील सत्तासंघर्षांनंतर पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. या लोकसभेला अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर अजित पवार म्हणाले, मी लोकसभेचा विचार केलेला नाही. इतक्या लवकर त्यावरच चर्चा करून काही फायदा नाही


हे ही वाचा :


नागालँडमधील अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक, पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याची मागणी