पुणे : राज्यात झालेल्या तीन मोठ्या अपघातात (Accident News) 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. राज्यभरात घडलेल्या तीन भीषण अपघातांनी (Accident News) हळहळ व्यक्त होत असून एकूण १३ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. नातेपुतेजवळील अपघातात एका कुटुंबावर काळाचा घाला आला, तर परशुराम घाटातील अपघातात (Accident News) प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.(Accident News)

Continues below advertisement

Accident News: नातेपुतेजवळ कार अपघातात आई-वडिलांसह विवाहित मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी 

मुंबई येथून माळशिरसमध्ये येणाऱ्या कारच्या चालकाला झोपेची पेंग आली. यामध्येच कारवरील ताबा सुटून कार थेट कालव्यात जाऊन  कोसळली. यामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथील हनुमंत जठार, मंजुळा जठार व प्रीती टिळेकर अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील जठार दांपत्य हे प्रीती टिळेकर यांचे आई-वडील असून या दुर्दैवी घटनेत आई वडील व विवाहित मुलगी अशा तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर गाडी चालवणाऱ्या जावई हा देखील गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे टिळेकर यांच्या दोन चिमूरड्या मुलांवरही आभाळ कोसळले आहे. ही घटना काल (शुक्रवारी) घडली असून यानंतर पोलिसांनी तात्काळ निरा उजव्या कालव्यातून कार बाहेर काढून मृतदेह देखील बाहेर काढले आहेत.(Accident News)

Accident News: परशुराम घाटात मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे आज शनिवार दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महेंद्र XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय ३३, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Continues below advertisement

Accident News: नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा अंत

नाशिकमधील दिंडोरीतील विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या 'इर्टिका' कारने (क्रमांक MH15-JS-1053) घराकडे परतत होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. (Nashik Accident News) यानंतर भरधाव कार थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने कारचा शोध घेणं कठीण जात होतं. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील नऊही जणांचा श्वास थांबला होता.

Accident News: मृतांची यादी

1. सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32)

2. रेशमा सुनील दरगोडे (वय 27)

3. आशा अनिल दरगोडे (वय 32)

4. गुणवती सुनील दरगोडे (वय 11)

5. श्रेयश अनिल दरगोडे (वय 11)

6. श्रावणी अनिल दरगोडे (वय 11)

7. सृष्टी अनिल दरगोडे (वय 14)

8. समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय 7)

9. श्रद्धा अनिल दरगोडे (वय 13)

(सर्व रा. इंदोरे, ता. दिंडोरी)

 

 इतर महत्वाच्या बातम्या