(Source: ECI | ABP NEWS)
Accident News : नाशिक आणि वर्ध्यात भीषण अपघात! चौघांचा मृत्यू, इतर चारजण जखमी
Maharashtra Accident News : नाशिकमध्ये बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. तर वर्ध्यात दुचाकी ट्रकला धडकल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

नाशिक : राज्यातील दोन विविध अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वर्ध्यातील अल्लीपूर येथे एक दुचाकी ट्रकला धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Nashik Accident : भरधाव बसची धडक, नाशिकमध्ये दोघांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संतोष एकनाथ संसारे, रा. लेखनगर आणि रूपाली सचिन काळे, रा. नारायण बापू चौक, हे उपनगर नाका येथील झाडाखाली उभे होते. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी नवीन बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले. यामध्ये गंभीर प्रकारे जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Wardha Accident : वर्ध्यात दोघांचा मृत्यू
तुळजापूर-नागपूर मार्गावर देवळी तालुक्यातील शिरपूर येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अल्लीपूर येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अल्लीपूर येथील रहिवासी प्रफुल किटे आणि समीर रेंढे हे दोघेही काही कामानिमित्त शिरपूर येथे गेले होते. शिरपूर येथील काम झाल्यानंतर अल्लीपूरला परत येत असताना देवळी तालुक्यातील शिरपूर गावाजवळी रत्नापूर फाट्याजवळ दुचाकी ट्रकला धडकली. ट्रकच्या धडकेत प्रफुल कीटे (वय 38) आणि समीर रेंडे ( वय 21) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ही बातमी वाचा:
























