Railway Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirwan Din) प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 10 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर (Nagpur) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईपर्यंत तीन विशेष गाड्या धावतील, सहा विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / दादर ते सेवाग्राम / अजनी / नागपूर आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असेल.


विशेष गाड्यांचा तपशील...



  • विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4 डिसेंबरला रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक 01264 ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईला पोहोचेल.

  • 01266 क्रमांकाची विशेष रेल्वे गाडी 9 डिसेंबरला दुपारी 3.50 वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईला पोहोचेल.

  • सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 02040 अजनी येथून 7 डिसेंबर रोजी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक 02249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून 6 डिसेंबरला सायंकाळी 4.45 वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून 6 डिसेंबरला सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसया दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक 01253 दादर येथून 6 डिसेंबरला मध्यरात्री सुटेल आणि 7 डिसेंबरला दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल

  • गाडी क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून 7 डिसेंबरला दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता नागपूरला पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.05 वाजता नागपूरला पोहोचेल. 

  • विशेष गाडी क्रमांक 1259 दादर येथून 7 डिसेंबरच्या मध्यरात्री सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल.


विशेष गाड्यांचे थांबे


महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांचे अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इतगपुरी, कसारा, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबे असतील.


ही बातमी देखील वाचा


RTMNU Elections : विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक : अंतिम मतदार यादीत गंभीर चुका, पत्ता नसलेले मतदार साडेसात हजारांवर