मुंबई : महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांच्या नेत्यांनी 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, 27 तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणं शक्य नसल्याची भूमिका आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवरुन माहिती दिली आहे. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला आणि त्यांनी 27 फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. आम्ही त्यांना सांगितले की, 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे.  महाराष्ट्राची पूर्ण राज्य कमिटी यावेळी पुण्यात असणार आहे. तसेच, जयंत पाटील यांना विनंती केली आहे की, 28 तारखेला शक्य होत असेल तर आपण तेव्हा बैठक ठरवू, असे आंबेडकर म्हणाले. 


अन्यथा बैठकीला उपस्थित राहणं जमणार नाही...


पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले की, "जयंत पाटील यांनी याविषयी पक्षातील लोकांशी चर्चा करुन सांगतो म्हटले आहे. मात्र, सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये 27 फेब्रुवारीला बैठक असल्याचे सांगितले आहे. पण, आम्ही संजय राऊत यांना सांगतोय, की पुण्यात जाहीर सभा संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे 27 च्या बैठकीला आमचे जमणार नाही, पण तीच तारीख 28 होणार असेल तर आम्ही येऊ," असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 


आरक्षणाचा विषय चिघळताना दिसतोय...


दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'आरक्षणाच्या बाबत महाराष्ट्रमध्ये दोन गट पडले आहेत. एकाच नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत. दुसऱ्या बाजूला ओबीसी, भटके यांचं संघटन आहे. परंतु, आमच्या ताटातल देऊ नका. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या ही परिस्थिती आहे. शासनाने जी भूमिका घेतली पाहिजे ती भूमिका घेताना दिसत नाही. उलट हा प्रश्न चिघळेल कसा हा प्रयत्न सुरु आहे. शासनाने यावरती तोडगा काढला पाहिजे. मुंबईच्या आंदोलनानंतर हा प्रश्न मिटेल असे वाटले होत, मात्र तो चिघळताना दिसतोय,' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करा, प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचं महाविकास आघाडीला रोखठोक पत्र