Madha Zilla Parishad election Result 2026  :  राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकालहाती आले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सोलापूरमधील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सुफडा साफ झाला आहे.भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. हा आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या नेतृत्वात माढ्यात भाजपचं कमळ फुललं आहे. 

Continues below advertisement

जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार जागांवर भाजपाला विजय, अजित पवार गटाला दोन जागा, तर शिवसेना शिंदे गटाला एक जागा

माढा तालुक्यात शरद पवार गटाचा सुपडा साप झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्या आहेत.  माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती. माढ्यात आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब जिल्हा परिषद गटातून भाजपच्या वंदना कांबळे यांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती शिंदे यांचा पराभव झाला आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे पृथ्वीराज शिवाजी सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुहास पाटील यांचा पराभव केला आहे. कुर्डू जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे संभाजी ढाणे विजयी झाले आहेत. 

माढा तालुका जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

मानेगाव जिल्हा परिषद गट - पृथ्वीराज सावंत (भाजप)

Continues below advertisement

मोडनिंब -  वंदना कांबळे (भाजप)

टेंभूर्णी - अमृता वाघ (भाजप)

उपळाई बु - माधुरी मोरे (भाजप)

कूर्डू - संभाजी ढाणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

भोसरे - अश्विनी दळवी ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

बेंबळे - सविता कोकाटे (शिवसेना शिंदे गट)

माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकही जिल्हा परिषदेची जागा मिळाली नाही. हा आमदार अभिजीत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अभिजीत पाटील यांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती. मात्र, भाजपनं त्यांना मोठा धक्का दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Dharashiv Zilla Parishad election result 2026 :  भूम वाशी परांडा मतदारसंघात तानाजी सावंतांचा दबदबा कायम, शिवसेनेचा किती जागांवर विजय?