एक्स्प्लोर

माढ्यात शिंदेंचं कमबॅक! शिंदे सावंत साठे युतीचा आमदार अभिजीत पाटलांना दणका, कोणत्या पक्षाला किती जागा?   

माढा तालुक्यात देखील भाजपचं कमळ फुललं आहे. माढा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आणि तालुका पंचायत समितीचे 14 गण आहे. यातील भाजपला जिल्हा परिषदेच्या चार जागांवर विजय मिळाला आहे.

Madha Zilla Parishad election Result 2026  :  राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. माढा तालुक्यात देखील भाजपचं कमळ फुललं आहे. माढा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आणि तालुका पंचायत समितीचे 14 गण आहे. यातील भाजपला जिल्हा परिषदेच्या चार जागांवर विजय मिळाला आहे. तर दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांना जिंकला आली नाही. दुसरीकडे विजयामुळं भाजप नेते रणजित शिंदे यांची ताकद वाढली आहे. 
 
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माढा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील आणि भाजप नेते रणजित शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं होतं. दोघांनी देखील ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. त्यामुळं या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली होती. माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सा सामना झाला होता. मात्र, अखेर भाजपने माढा तालुक्यात मोठा विजय मिळवला आहे. माढ्यात भाजपला जिल्हा परिषदेच्या चार जागा मिळाल्या आहेत. या जागांवर भाजपचे नेतृत्व रणजित शिंदे यांनी केले होते. तर राष्ट्रवादीला ज्या दोन जागा मिळाल्या आहेत, त्याचे नेतृत्व माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले होते. त्यामुळं सात जागांपैकी सहा जागांवर शिंदेंचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. 

शिंदेंचे पुन्हा कमबॅक

माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी माझा तालुक्यात पुन्हा कमबॅक केलं आहे. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. शिंदे बंधुंनी निंबाळकरांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माढ्यातून माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी त्यांचा परभव केला होता. त्यामुळं अभिजीत पाटील यांची ताकद वाढल्याचं बोललं जात होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील शिंदेंना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र, माढ्यात वारं फिरलं असून पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या चाव्या शिंदे कुटुंबाच्या हाहात दिल्या आहेत. शऱद पवार गटाचा सुफडा साफ झाला आहे. हा अभिजीत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

माढ्यात एस फॅक्टरची जोरदार चर्चा

या निवडणुकीच्या निमित्ताने माढ्यात एस फॅक्टर पाहायला मिळाला. रणजितं शिंदे, दादासाहेब साठे आणि शिवाजीराव सावंत हे तिन्ही नेते एकत्र आले. त्यामुळं माढ्यात शिंदे सावंत साठे असा एस फॅक्टर तयार झाला. त्यामुळं भाजपची ताकद वाढली. तिन्ही नेते एकत्र झाल्यामुळं मतांचं विभाजन झालं नाही. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला आहे. मानेगवा जिल्हा परिषद गटातून शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत हे विजयी झाले आहेत. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याच गटातून त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. 

ऊस दराच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप

ऊस दराच्या मुद्यावरुन देखील माढ्यात राजकीय वातावरण चागलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आणदार अभिजीत पाटील यांनी मागील वर्षी ऊसाला 3 हजार 500 रुपयांचा दर देतो असं जाहीर केलं होतं. मात्र, अद्याप त्यांनी तो दर दिला नाही. 3000 दर दिला होता. त्यानंतर निवडणुकीच्या आधी 100 रुपये देणार असे जाहीर केले आहे. म्हणजे एकूण 3100 रुपये दर दिला आहे. म्हणजे आणखी 400 रुपये त्यांच्याकडे बाकी आहेत. याच मुद्यावरुन रणजित शिंदे यांच्या निवडणुकीच्या काळात टीका केली होती. तुम्ही जे बोललाय ते करा, जाहीर केलेला दर द्या असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसेच कारखान्यासाठी घेतलेले 350 कोटी रुपये काय केले? असे सवाल देखील केले होते. त्यांच्या या टीकेला अभिजीत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. तुमचे वडील (बबनदादा शिंदे) यांनी दिलेला शब्ध पाळा आणि माझ्यापेक्षा एक रुपया दर जास्त देऊन दाखवा असे आव्हान अभिजीत पाटील यांनी दिले होते. तसेच दूध संघाच्या जमिनीच्या मुद्यासह भ्रष्टाचाराचे आरोप देखील पाटील यांनी केले होते. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं.

माढा तालुका जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

मानेगाव - पृथ्वीराज सावंत (भाजप)
मोडनिंब -  वंदना कांबळे (भाजप)
टेंभूर्णी - अमृता वाघ (भाजप)
उपळाई बु - माधुरी मोरे (भाजप)
कूर्डू - संभाजी ढाणे (राष्ट्रवादी अजित पवार गट),
भोसरे - अश्विनी दळवी ( राष्ट्रवादी अजित पवार गट)
बेंबळे - सविता कोकाटे (शिवसेना शिंदे गट)

माढा तालुका पंचायत समितीचे विजयी उमेदवारांची यादी

1) मानेगांव पंचायत समिती गण-
पंडित देशमुख (भाजपा)

2) दारफळ पंचायत समिती गण-
सोनाली साठे (अपक्ष)

3)उपळाई बु  पंचायत समिती गण 
नितीन झाडबुके (भाजपा)

4) भूताष्टे  पंचायत समिती गण 
स्वाती गिड्डे (भाजप पुरस्कृत अपक्ष)

5) मोडनिंब पंचायत समिती गण 
प्राजक्ता पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)

6) लऊळ पंचायत समिती गण 
सोनाली माळी (भाजप)

7) रांझणी  पंचायत समिती गण 
सुनिता पाटील (भाजपा) 

8) टेंभुर्णी पंचायत समिती गण 
प्रतिभा खरात (भाजपा)

9) पिंपळनेर  पंचायत समिती गण 
बिभीषण डांगे (भाजपा) 

10) बेंबळे पंचायत समिती गण 
पोपट अनपट (राष्ट्रवादी शरद पवार गट)

11) कुर्डु  पंचायत समिती गण
अमृता पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)

12) अकोले खु पंचायत समिती गण 
संभाजी पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)

13) भोसरे  पंचायत समिती गण
आशिष रजपूत (राष्ट्रवादी अजित पवार गट)

14) रोपळे   पंचायत समिती गण
छायादेवी करंडे  (राष्ट्रवादी अजित पवार गट)

महत्वाच्या बातम्या:

माढ्यात शरद पवार गटाचा सुपड़ा साफ, भाजपचं कमळ फुललं, आमदार अभिजीत पाटलांना मोठा धक्का

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget